संगमनेर LIVE (लोणी) | जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा समिती राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने पदमश्री विखे पाटील सैनिक स्कुल लोणी येथे शालेय तालुका कबड्डी स्पर्धेस मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यामध्ये ४५ विविध विद्यालयातून मुले व मुली मिळून एकुण ५४० खेळाडूनी सहभाग नोंदविला.
यावेळी सैनिक स्कुलचे प्राचार्य गाढवे उपस्थित होते. तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष प्रा. सुनिल आहेर, जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनिल गागरे , प्रवरा पतसंस्थेच्या चेअरमन सौ. विद्या गाढे, संस्थेचे क्रिडा संचालक डाॅ. प्रमोद विखे, प्रा. वाणी, प्रा. उत्तम अनाप, प्रा. सुनिल चोळके, प्रा. झुरुळे, प्रा. दुशिंग, प्रा. कडसकर, प्रा. घोलप, प्रा. अनिल चिधें, प्रा. दादा तुपे उपस्थित होते.
दरम्यान या स्पर्धेच्या नियंत्रणाची जबाबदारी प्रा. बाबा वाणी यांनी पार पाडली तर आभार प्रा. प्रतिक दळे मानले आहेत.