◻️ सौ. शालिनीताई विखे पाटील यांचे प्रतिपादन
◻️ विविध विद्यालयातील ३६९ विद्यार्थ्यानचे उत्कृष्ट असे गुणदर्शन
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कला, विज्ञान, वाणिज्य व संगणकशास्त्र महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ट महाविद्यालयात राज्याचे महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून व युवानेते खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव २०२३” चे आयोजन करण्यात आलेले असून, या महोत्सवाचा उदघाटन सोहळा गुरुवार दि. २१ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
या उदघाटन सोहळ्याप्रसंगी सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी या सोहळ्यात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला गुणांना संधी मिळावी यासाठी सुरु केल्याचे आवर्जून सांगत सर्वाना शुभेच्छा दिल्या. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या आश्वी खुर्द व परिसरातील ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.
या उध्दघाटन सोहळ्यासाठी माजी जिल्हापरिषद सदस्य अण्णासाहेब भोसले, विखे पाटील कारखान्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, रामभाऊ भुसाळ, बापूसाहेब गायकवाड, भाऊसाहेब जऱ्हाड, भगवानराव इलग, अप्पासाहेब म्हस्के, सौ. रोहिणीताई निघुते, सौ. कांचनताई मांढरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी “प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव २०२३” चे समन्वयक राम पवार, महोत्सवाचे प्रमुख व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य सयराम शेळके, प्रा. देविदास दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने तसेच विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. सोमनाथ भुमकर, प्रा. कदम, प्रा. खर्डे, श्रीमती निचळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान या सोहळ्यात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ट महाविद्यालय आश्वी खुर्द, प्रवरा माध्यमिक विद्यालय पिप्रीं - लौकी, खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय ओझर व प. पू. गगनगिरी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरणे या विद्यालयातील एकूण ३६९ विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करून उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन केले.