काक स्पर्श होण्याआधीचं वडीलाच्या दशक्रिया विधीतचं मुलांवर काळाचा घाला

संगमनेर Live
0
◻️ पिप्रीं - लौकी अजमपूर येथिल ह्रदय पिळवून टाकणाऱ्या घटनेने परिसरात शोककळा 

◻️ दराडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला ; एकाचं कुटुंबातील दोन पुरुषाचा मृत्यू 

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील पिंप्री - लौकी अजमपुर गावात नुकतीच मन हेलवणारी व मनाला सुन्न करणारी घटना घडली असून १० दिवसापुर्वी येथील मितभाषी व जुन्या पिढीतील पदवीधर लक्ष्मण कारभारी दराडे यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले होते. गुरुवार दि. २१ रोजी त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडत असतांना काक स्पर्श होण्याआधीचं त्यांचा मोठा मुलगा दिलिप (वय - ४०) यांचे देखिल ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिप्रीं - लौकी अजमपूर येथे दहा दिवसांपूर्वी येथिल लक्ष्मण कारभारी दराडे यांचे उपचारादरम्यान एका खाजगी रुग्णालयात निधन झाले होते. गुरुवार दि. २१ रोजी त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम सुरु होता. त्यासाठी ग्रामस्थासह नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

याचंवेळी पिंडाला कावळा शिवण्याचा विधी सुरु असताना हात जोडुन उभे असलेले दिलीप दराडे हे अचानक खाली कोसळले. त्यामुळे ग्रामस्थ व नातेवाईक यानी वेळ न दवडता दराडे यांना आश्वी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतू दराडे यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याना पुढील उपचारासाठी प्रवरा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारतराव गिते यानी महसुलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना दुरध्वनीवरून या दुर्दैवी घटनेची माहीती दिल्यानंतर विखे पाटील यांनी प्रवरा रुग्णालयातील डॉक्टरांना उपचाराबाबत योग्य त्या सुचना दिल्या. यावेळी रमेश गिते, संजय बिडवे, भाऊसाहेब गिते, मगन गिते, बाजीराव गिते, सूर्यभान गिते, नामदेव आव्हाड, भाऊसाहेब मुंढे, आनंदा दराडे, सतिष सोसे आदी रुग्णालयात धीर देण्यासाठी उपस्थित होते. मात्र तेथील डॉक्टरांनी दराडे यांनी मृत घोषित केले.

ह्रदय विकाराच्या तीव्र धक्याने वडिला पाठोपाठ मुलानेही जगाचा निरोप घेतल्याची बातमी वार्‍यासारखी आश्वी सह परिसरात पसरल्याने सर्वत्र शोककळा पसरली होती. दुपारी शोकाकुल वातावरणात दिलीप दराडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रूपो अंतोलिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव (पुणे) कंपनीत ते नोकरीस असल्यामुळे कंपणीचे कामगार युनियन अध्यक्ष व उपाध्यक्ष मनोज विश्वासराव सतीश घुंगे यांच्यासह यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

दरम्यान ७ वर्षापुर्वी दराडे कुटुंबातील मयत दिलिप दराडे यांचा लहान भाऊ इंजि. महेंद्र दराडी यांचे देखिल सांगोला (पंढरपुर) येथे अपघाती निधन झाले होते. ते दुःख दराडे कुटुंब पचवत असतांना नियतिने १० दिवसात दराडे कुटुंबातील दोन पुरुषाना हिरावुन नेले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भारतराव गिते यांनी दिली आहे. तर दिवंगत दराडे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार असून याप्रसंगी उपस्थित असलेल्या नागरीकाचे डोळे समोरील चित्र पाहून पाणावले होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !