◻️ कै. डॉ. देवेंद्र ओहरा यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम
संगमनेर LIVE | रंग भरताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह हीच खरी कै. डॉ. देवेंद्र अमृतलाल ओहरा यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली असे प्रतिपादन नाशिक पदवीधर विभागाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी संग्राम संगमनेर परिवार व डॉक्टर देवेंद्र ओहरा मित्र मंडळ आयोजित तालुकास्तरीय रंगभरन स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.
गेल्या ३० वर्षापासून कै. डॉ. देवेंद्र ओहरा यांच्या स्मृती दिनानिमित्त अशा प्रकारचे विविध कार्यक्रम संस्थेमार्फत राबविले जातात. कार्यक्रमाच्या उदघाटना प्रसंगी संगमनेर नगर परिषदेच्या प्रथम नागरिक सौ. दूर्गाताईं तांबे, संग्राम संगमनेर संस्थेचे सरचिटणीस डॉ. अरविंद रसाळ, खजिनदार डॉ. मछिंद्र घुले, ओहरा परिवरतील राजेन्द्र, शैलेन्द्र, पीयूष, श्रीपाल, डॉ. निरज, सुरज, कल्पना, तृप्ती, दीप्ति आदी सदस्य उपस्थित होते.
बक्षीस वितरण सुप्रसिद्ध नृत्यांगना सिनेतारका मंदाताई खेड़कर व सुप्रसिद्ध चित्रकार राजेश खोल्लम, यशश्विनी संस्थेंचे अध्यक्ष आदित्य घाडगे यांच्या हस्ते संपन्न झाला. रंभरण स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक पोंदे, सतिश गोरे,महेश खांडरे, मिनीनाथ खराटे, विजय पवार, किरण भालेराव आदींनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलाशिक्षक संजय मासाळ, विकास भालेराव, राजेन्द्र गोरे, संजय सोनवणे, मीनानाथ जोर्वेकर, संतोष गोरे, दत्ता बटवाल, थिटे, मुख्याध्यापक सुनील कवडे, चांगदेव खेमनर तसेच संगमनेर तालुका कला शिक्षक संघटना, कलाश्री चित्रकला महाविद्यालय व संगमनेर अध्यापक महाविद्यालय यांच्या प्रथम द्वितीय वर्षाचे विद्यार्थी तसेच संग्राम निवासी मुकबधीर विद्यालय व डॉ. देवेंद्र ओहरा मतिमंद विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
दरम्यान या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाऊसाहेब नरवडे व प्रकाश पारखे यांनी केले.