◻️ कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जात सरकारच्या निष्क्रिय कारभाराची माहिती जनतेला द्यावी - माजी मंत्री आ. थोरात
संगमनेर LIVE (नगर) | राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात नगर शहर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हा शासकीय विश्रामगृहावर स्वागत केले. यावेळी थोरात यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला. आगामी सार्वत्रिक लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने संघटना अधिक मजबूत करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी कार्यकर्त्याना केल्या.
यावेळी किरण काळे यांच्यासह मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, अभिनय गायकवाड, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, अलतमश जरीवाला, उषाताई भगत, मिनाज सय्यद, विकास भिंगारदिवे, आकाश आल्हाट, निजाम जहागीरदार, सुनील क्षेत्रे, फैय्याज शेख, हाफिज सय्यद, गणेश चव्हाण, विलास भिंगारदिवे, आप्पासाहेब लांडगे, आबासाहेब तुपरे, विश्वनाथ निर्वाण, प्रशांत जाधव, अजय मिसाळ, कल्पक मिसाळ आदींसह शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्याशी संवाद साधताना आ. थोरात म्हणाले की, लोकसभा, विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. देशात परिस्थिती बदलत चालली आहे. काँग्रेसला उज्वल भवितव्य आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम करावे. देशाच्या संविधानाचे रक्षण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जात सरकारच्या निष्क्रिय कारभारा बद्दलची माहिती जनतेला द्यावी.
यावेळी शहर काँग्रेसच्या महिला काँग्रेस, युवक व क्रीडा विभाग, ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक विभाग, मागासवर्गीय विभाग, कामगार सेल आदी विविध फ्रंटल, सेलच्या प्रमुखांनी आपल्या कामकाजाचा आढावा सादर केला. संघटनात्मक वाढीसाठी हाती घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. रिक्त असणाऱ्या सेलवर लवकरच पदाधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले.