◻️ वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासदाना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात पतसंस्था क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आश्वी बुद्रुक येथिल अश्विनी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उदया रविवार दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी चेअरमन मेजर संपत सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्याची माहीती संस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब डहाळे यांनी दिली आहे.
यावेळी अहवाल ताळेबंद, नफातोटा, पत्रक वाचुन मंजुर करणे, नफा वाटणी, लेखापरिक्षण अहवाल वाचन व दोष दुरुस्ती अहवाल वाचन करणे, संस्थेसाठी गरजेनुसार बाहेरुन कर्ज उभारणे अधिकार संचालक मंडळास देणे, लेखापरिक्षकाची नेमणुक, अंदाजपत्रकास मंजुरी, शाखा विस्तार जागा खरेदी करणेबाबत संचालक मंडळास अधिकार देणेबाबत , सभासद निकष, संचालक व त्यांच्या नातेवाईकांच्या कर्ज यादी, कर्ज व ठेवी यांचे व्याजदर ठरविण्याचा अधिकार संचालक मंडळास देणे आदि विषयावर चर्चा होणार आहे. संस्थेला अहवाल सालात १७ लाख ७१ हजार ७३६ रुपयाचा अर्थिक नफा झाला आहे. १९८५ साली स्थापन झालेल्या अश्विनी पंतसंस्थेचा सतत आँडीट वर्ग ‘ अ ’ आहे. चालू वर्षीही संस्थेला ऑडीट वर्ग अ मिळाला असून संस्थेस आयएसओ मानांकन तसेच राज्यस्तरीय अनेक पुरस्कारानी गौरवण्यात आले आहे.
आश्वी व परिसरातील गावातील गोर-गरीब शेतकरी व कष्टकरी महिलाची कामधेनू म्हणून अश्विनी पतसंस्था ओळखली जाते. या संस्थेच्या आश्वी बुद्रुक, शेडगाव, पिप्रीं व आश्वी खुर्द या ठिकाणी चार शाखा कार्यरत आहेत. संस्थेच्या एकून ठेवी १७ कोटी २३ लाख ५० हजाराच्या वर असून संस्थेने १० कोटी ५ लाख २७ हजार ३२३ रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेचे भागभाडंव ३६ लाख ४२ हजार ८७० असुन संस्थेचा स्वनिधी २ कोटी २३ लाख ३६ हजार ४२५ गुंतवणुक १२ कोटी २४ लाख १२ हजार ७८१ तर संस्थेने अहवाल सालात १०० कोटी ३७ लाख ९६ हजार ४७१ रुपये चा व्यवसाय केला.
अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या अश्विनी पंतसंस्थेची आश्वी बुद्रुक येथे स्वंता: च्या मालकीची भव्य ईमारत आहे. २३४८ हे संस्थेचे सभासद आहेत. महिला व पुरुष सबलीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून अश्विनी पतसंस्था हि मोठ्या प्रमाणात काम करत आहे.
दरम्यान अश्विनी संस्थेच्या प्रगतीसाठी सरव्यवस्थापक बाळासाहेब डहाळे, प्रवरा बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भवर, पंचायत समिती सदंस्य निवृत्ती सांगळे, संस्थापक गंगाधर आंधळे, अध्यक्ष मेजर संपतराव सांगळे, उपाध्यक्ष विनित गांधी, संचालक तुळशिराम म्हस्के, वंसत वर्पे, सखाहारी नागरे, भाऊसाहेब लावरे, सौ. पुष्पा भवर सौ. कल्पना बोन्द्रे, राजेंद्र गिते, हरिभाऊ ताजणे, भगवान खामकर, जेहुर शेख, डॉ. अनिल बालोटे, अँड. संजय गाधी, शाखा अधिकारी श्रीमती विना देवळालकर, पद्माकर नाके, सुरेश आंधळे, रमेश जाधव असि. मॅनेजर बाळासाहेब गिते आदिसह सर्व कर्मचारी व सभासद प्रामाणिक प्रयत्न करत असून रविवारी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासदानी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.