◻️ आश्वी खुर्द सह पंचक्रोशीतून मोरे कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील रहिवासी असलेले शरद नाना मोरे यांची नुकतीच चिंचवड वाहतूक शाखेत पोलीस उप निरीक्षक पदी पदोन्नती झाली असून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या या यशाबद्दल आश्वी खुर्द सह पंचक्रोशीतून मोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पोलीस उप निरीक्षक शरद मोरे हे आश्वी खुर्द येथील सर्व सामान्य कुटुंबातील कै. नाना मुक्ता मोरे यांचे चिरंजीव आहेत. घरची परिस्थिती जेमतेम असली तरी, जिद्द व कर्तबगारीच्या बळावर खंडाळा येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर पुणे जिल्ह्यातील पोलीस दलात ते १९९४ साली भर्ती झाले होते.
यावेळी त्यांनी १९९४ ते सन २००० पर्यंत पिपंरी पोलीस ठाणे, २००० ते २००६ पर्यत चतुर्शीगी पोलीस ठाणे, २००६ ते २०१२ पर्यत भोसरी पोलीस ठाणे, २०१२ ते २०१७ पर्यंत डेक्कन पोलीस ठाणे, २०१७ ते २०१८ पर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे दिमाखदार कामगिरी केली.
यानंतर देहूरोड वाहतूक विभागात बदली झाली असता तळेगाव रोड ते तळेगाव याठिकाणी काम केले आहे. तर पुन्हा चिंचवड येथे बदली झाल्यानंतर उत्कृष्ट काम करत असताना नुकतीचं चिंचवड वाहतूक विभागात शरद मोरे यांना पोलीस उप निरीक्षक पदी बढती मिळाली आहे.
दरम्यान आश्वी खुर्द येथील मनमिळावू व गरीब कुटुंबातील शरद मोरे यांना पोलीस दलात पदोन्नती मिळाल्यामुळे आश्वीसह पंचक्रोशीतून मोरे कुटुंबासह शरद मोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.