लायन्स संगमनेर सफारचे भव्य रक्तदान शिबीर

संगमनेर Live
0
◻️ १११ दात्यांनी केले रक्तदान

◻️ रक्तदात्यासाठी १ लाख रूपयांचा अपघाती विमा मोफत

संगमनेर LlVE | लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या वतीने तसेच ज्ञानराज करिअर अ‍ॅकेडमी, ध्येय करिअर अ‍ॅकेडमी व एस. के. फिटनेस क्लब यांच्या सहकार्याने नुकतेच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन मालपाणी लाॅन्स, काॅलेज रोड, संगमनेर येथे करण्यात आले होते. या शिबीरामध्ये १११ दात्यांनी रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. 

लायन्स क्लब संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीष मालपाणी, मा. अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, विशाल नावंदर, कल्याण कासट यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संगमनेर सफायरचे अध्यक्ष अतुल अभंग, सचिव जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा,महेश डंग, राजेश मालपाणी, रोहित मणियार, डाॅ. योगेश गेठे, प्रफुल्ल खिंवसरा, डाॅ. सागर फापाळे, संतोष अभंग, नामदेव मुळे, सुनिता मालपाणी, नम्रता अभंग, डाॅ. मधुरा पाठक, प्रियंका कासट, पूजा कासट हे उपस्थित होते.

पूर्ण शारीरिक आरोग्यासाठी रक्तदान फायदेशीर ठरते. रक्तदान केल्यानंतर रक्तातील प्लाज्मामध्ये ल्युकोसाईट्सची वृद्धी होते. ल्युकोसाईट्स आपल्या प्रतिकारशक्तीसाठी कार्यरत असतात. कोणत्याही गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती योग्य असणे गरजेचे आहे. 

अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतिपश्चात रक्तस्राव, शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते.

शिबीराचे उद्घाटन ज्ञानराज करिअर अ‍ॅकेडमीचे संस्थापक भास्कर शिंदे, ध्येय करिअर अ‍ॅकेडमीचे संस्थापक रामदास सदगीर, व एस. के. फिटनेस क्लबचे संस्थापक सागर खालकर यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रत्येक रक्तदात्यास यावेळी १ लाख रूपयांचा अपघाती विमा मोफत देण्यात आला. रक्तदानानंतर प्रत्येकास अल्पोपहार, ब्लड बँकेचे सर्टिफफिकेट आणि डिस्काऊंट कुपन देण्यात आले.

दरम्यान या रक्तदान शिबिरासाठी लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरचे सर्व पदाधिऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. ऑक्टोबर सेवा सप्ताहात केलेल्या या कार्याबद्दल लायन्स क्लब संगमनेर सफायरचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !