◻️ गौरी शेलार हिने पटकावला प्रथम क्रमांक
संगमनेर LIVE (अकोले) | अखिल भारतीय किसान सभा, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय.) व डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय.) यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने अकोले येथे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील विविध शाळांमधून स्पर्धेमध्ये १०१३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पैकी ११० विद्यार्थ्यांची तालुका स्तरावरील प्रत्यक्ष निबंध लेखनासाठी निवड करण्यात आली होती. प्रत्यक्ष निबंध लेखात सहभागी विद्यार्थ्यांमधून अंतिमत: उत्कृष्ट निबंधांमध्ये ९ निबंध पारितोषिकांसाठी निवडण्यात आले आहेत.
अकोले तालुक्यातील क्रांतिकारकांचा इतिहास या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक कु. गौरी विजय शेलार (अगस्ती विद्यालय, अकोले) ३ हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक कु. प्रेरणा भारत भोमले (कळसेश्वर विद्यालय, कळस बु.) २ हजार रुपये व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक कु. ईश्वरी सुनिल भोसले (अगस्ती विद्यालय, अकोले) १ हजार रुपये व प्रमाणपत्र, तीन उत्तेजनार्थ पारितोषिके कु. अंकिता रंगनाथ पवार (अढळा विद्यालय, देवठाण), गोरक्ष बाबुराव लहामटे (सर्वोदय विद्यामंदिर, राजूर), कु. निकिता खंडू खाटेघरे (सह्याद्री विद्यालय, ब्राम्हणवाडा) प्रत्येकी ५०० रुपये व प्रमाणपत्र, तीन प्रोत्साहनपर पारितोषिक कु. सायली शंकर तळेकर (आम्लेश्वर विद्यालय, आंभोळ), कु. विद्या सुभाष वाघ (आदर्श आश्रमशाळा, भंडारदरा कॅम्प, मवेशी) कु. समीक्षा नानासाहेब नाईकवाडी (रत्नागिरी माध्यमिक विद्यालय, गर्दणी) प्रत्येकी ३०० रुपये व प्रमाणपत्र जाहीर करण्यात आले आहेत. सहभागी सर्व १०१३ स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. आयोजक संबंधित शाळेत जाऊन पुरस्कारांचे वितरण करणार आहेत. विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
अकोले तालुक्यातील क्रांतीकारकांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रामजी भांगरे, राघोजी भांगरे, कोंडाजी नवले, होनाजी केंगले, धारेराव आसवले, रामा किरवे, बुवा नवले, मुरलीमास्तर नवले, सक्रू बुधा मेंगाळ, अमृतभाई मेहता यासह अनेक क्रांतिकारकांचे संदर्भ देत उत्कृष्ट निबंध लिहिले आहेत.
स्पर्धेच्या आयोजनात डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे, ज्ञानेश्वर काकड, ललित छल्लारे, भाऊसाहेब चासकर, भाऊसाहेब कासार, घनश्याम माने, दिपक पाचपुते, संजय पवार, मधुकर शेटे, राजेंद्र भाग्यवंत, जितेंद्र खैरनार, अजय पवार, विकास पवार, बाळासाहेब शेळके, आदिनाथ सुतार, नारायण छल्लारे, प्रशांत धुमाळ, राजेंद्र भांगरे, बाळासाहेब तोरमल, अनिल पवार, सुनील शेळके, काळू सारोक्ते, नामदेव सोंगाळ, कुसुम वाकचौरे, प्रतीक्षा उगले, प्रविण मालूंजकर, एकनाथ सदगीर आदींनी सहभाग घेतला.