आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मागणीला यश ; डाव्या कालव्यातून पाणी सुटले!

संगमनेर Live
0
◻️ उजव्या कालव्याचे कामही तातडीने करून पाणी सोडा - आमदार बाळासाहेब थोरात

◻️ अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना विश्वासात घ्या


संगमनेर LIVE | निळवंडे धरण हे उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी गावांसाठी बांधले गेले असून या भागात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे पिके वाया गेली आहेत. या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे व उजव्या कालव्याची कामे ही त्वरित पूर्ण करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने सरकारकडे केली आहे. आमदार थोरात यांच्या मागणीला यश आले असून आज डाव्या कालव्यातून पाणी सुटले आहे.

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे उजव्या कालव्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने आग्रही मागणी केली होती. याचबरोबर निळवंडे कृती समितीनेही १३ सप्टेंबर रोजी मोठे आंदोलन केले होते. यावर प्रशासनाच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी पाणी सोडण्याचे आश्वासित केले गेले. पुन्हा दहा ऑक्टोंबर अशा तारखा दिल्या. आमदार बाळासाहेब थोरात व जनतेच्या रेटा यापुढे सरकार झुकले असून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.

उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावात करिता काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून निळवंडे धरण व कालव्यांची कामे अगदी कोरोनाच्या संकटातही रात्रंदिवस काम करून पूर्ण केली आहेत. मे महिन्यामध्ये भंडारदरा व निळवंडे दहा टीएमसी पाणी असल्याने डाव्या कालव्यातून पाणी सोडावे अशी मागणी आमदार थोरात यांनी केली होती. या नंतर डाव्या कालव्याला पाणी सोडले होते.

यावर्षी या उत्तर नगर जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरिपाची पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढलेली महागाई, बेरोजगारी, दुष्काळाची छाया, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न, रोजगार हमीच्या कामांचा प्रश्न, असे अनेक प्रश्न जनतेसमोर आहेत. मात्र या सर्व प्रश्नांबाबत सरकार उदासीन असून या सर्व प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सरकारकडे केली आहे.

दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळावे यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण मागणीला मोठे यश आले असून आज प्रशासनाच्या वतीने डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे संगमनेर तालुक्यासह डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हे कालवे अविश्रांत परिश्रम करून पाठपुरावा करून पूर्ण केल्याबद्दल आणि डाव्या कालव्यातून पुन्हा पाणी सोडल्याबद्दल आमदार बाळासाहेब थोरात यांचे सर्व गावांमधून अभिनंदन होत आहे.

उजवा कालवा ही त्वरित पूर्ण करा - आमदार बाळासाहेब थोरात

उत्तर अहमदनगर जिल्ह्यात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे ही आपली सातत्याने मागणी राहिली आहे. याचबरोबर उजवा कालवा ही तातडीने पूर्ण झाला पाहिजे. अकोले तालुक्यातील शेतकरी, नागरिक यांनी कालव्यांच्या कामासाठी कायम मोठे सहकार्य केले आहे. त्यांना विश्वासात घेतले पाहिजे. उजव्या कालव्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करून टेस्टिंग करून सर्व गावांनाही त्वरित पाणी द्यावे अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !