◻️ लग्न समारंभ, नवीन घराची सजावट, ऑफिस व दुकान साठी लागणारी दर्जेदार व योग्य किंमतीचे फर्निचर व वस्तू मिळणार एकाचं छताखाली
संगमनेर LIVE | आश्वी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत विजयादशमीच्या म्हणजेचं दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर प. पु. ई. श्री ऋषिराजदादा परांडेकर व प. पु. ई. श्री हंसराज बाबा परांडेकर यांच्या शुभ आशिर्वादाने तसेच श्री व सौ. लता अशोक शिंदे यांच्या शुभहस्ते उद्या दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नुतन “श्रीकृष्ण फर्निचर मॉल”चा शुभारंभ होणार आहे. या सोहळ्याला आश्वीसह पंचक्रोशीतील नागरीकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीकृष्ण फर्निचर मॉलचे सर्वेसर्वा विशाल अशोक शिंदे यांनी केले आहे.
मागील दहा वर्षांपासून शिदें कुटुंब आश्वी बुद्रक येथे “श्रीकृष्ण इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल” या फर्मच्या माध्यमातून दर्जेदार व उत्कृष्ट सेवा पुरवत असल्याने या फर्मबआबत जनमाणसाबरोबरचं ग्राहकांमध्ये मोठी विश्वासार्हता निर्माण झाली आहे.
त्यामुळे लोकांची मागणी व गरज ओळखून शिंदे कुटुंबाने आश्वी - उंबरी रोडवरील श्रीकृष्ण मंदिरालगतचं सर्व सेवा सुविधा युक्त तसेच प्रशस्त जागेत सुसज्ज अशा “श्रीकृष्ण फर्निचर मॉल”ची उभारणी केली आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांना आता नामांकित कंपन्यांचे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल वस्तू, भांडी तसेच क्रॉकरी खरेदी करण्यासाठी शहरात जाण्याची गरज पडणार नाही. नववधूला विवाहात देण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे संसार उपयोगी साहित्य, फर्निचर, भांडी यासह उच्च गुणवत्तेचे फर्निचर आणि होम अप्लायंसेस या दालनात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यामुळे उद्या होणाऱ्या शुभारंभ सोहळ्यासाठी आश्वी सह पंचक्रोशीतील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवाराने उपस्थित राहावे असे आवाहन अण्णासाहेब बाळकृष्ण शिंदे, नितीन अशोक शिंदे, चेतन विठ्ठल शिंदे, नंदकुमार दत्तात्रय शिंदे व मॉलचे सर्वेसर्वा विशाल शिंदे यांनी केले असून अधिक माहितीसाठी 9039031170 ; 9039031171 ; 8793800202 या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले आहे.