उंबरी बाळापूर येथिल जिर्णोद्धार केलेल्या ख्रिस्त राजा चर्च चे उद्या लोकार्पण
◻️ नाशिक धर्मप्रातांचे डॉ. बिशप लुर्डस डॅनियल यांच्या हस्ते होणार लोकार्पण
◻️ तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांसह नोव्हेना भक्ती
संगमनेर LlVE | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथिल जुने व मोडकळीस आलेल्या चर्चचा गावातील ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येऊन जिर्णोद्धार केला असून उद्या शनिवार दि. २८ ऑक्टोबर रोजी नाशिक धर्मप्रातांचे महागुरू स्वामी डॉ. बिशप लुर्डस डॅनियल यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा ख्रिस्त राजा चर्चच्या प्रांगणात भक्तीमय वातावरणात संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
शनिवारी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमानिमित्त सायंकाळी ४ वाजता महागुरू स्वामी डॉ. बिशप लुर्डस डॅनियल यांची भव्य स्वागत मिरवणूक काढली जाणार आहे. यानंतर ६ वाजता पवित्र हिस्सा विधी पार पडणार असून त्यानंतर उपस्थित भाविकाना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. याप्रसंगी प्रमुख धर्मगुरू रे.फा. सायमन शिनगारे, सहायक धर्मगुरू रे.फा. प्रशांत शाहराव हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान या सोहळ्यानिमित्त त्रिदिन नोव्हेना भक्तीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बुधवारी धर्मगुरू रे.फा. राजु शेळके, गुरुवारी रे.फा. अजय शेळके यांनी आपल्या अमृततुल्य वाणीतून प्रवचन दिले. तसेच शुक्रवारी रे.फा. सायमन शिनगारे यांनी मुर्ती स्थापना व प्रार्थना विधी पार पडला आहे.
त्यामुळे उद्या शनिवारी भव्य ख्रिस्त राजा चर्च च्या उध्दघाटन, आशिर्वाद व लोकार्पण सोहळ्यासाठी नाशिक धर्मप्रातांचे महागुरू स्वामी डॉ. बिशप लुर्डस डॅनियल हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे या लोकार्पण सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील ख्रिस्ती बांधवासह संगमनेर व जिल्ह्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ख्रिस्त राजा तरुण मित्र मंडळ, संत योसेफ युथ ग्रुप उंबरी मळा, सर्व महिला बचत गट, सेट मेरी धर्मग्राम सल्लागार व कार्यकारणी मंडळाने केले आहे.