इतर साखर कारखान्यांच्या तोडीस - तोड ऊसाला भाव देऊ - रविंद्र बिरोले

संगमनेर Live
0
◻️ श्री गजानन महाराज साखर कारखान्यांचा बॉयलर प्रदीपन सोहळा गजानन महराजाचा जयघोष करत संपन्न 

◻️ दिवाळीसाठी शेतकऱ्यांना प्रतिटन १०० रुपये देणार

संगमनेर LIVE | देशाचे लोकप्रिय पंतप्रधान तिकडे निळवंडे धरणाचे लोकार्पण करत असताना श्री गजानन महाराज साखर कारखान्यांचा बॉयलर प्रदीपन सोहळा पार पडत असणे म्हणजे नियतीने घडवून आणलेला दुग्धशर्करा योग्य आहे. लवकरच निळवंडे धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून कारखाना परिसरातील गावांमधील शेतीमध्ये फिरणार असल्यामुळे हा परिसर भविष्यात ऊसाचे आगार होणार आहे. चालू गळीत हंगाम हा अडचणींचा असला तरी इतर साखर कारखान्यांच्या तोडीस - तोड ऊसाला भाव देऊ अशी ग्वाही संस्थापक चेअरमन रविंद्र बिरोले यांनी दिली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी बाबत बिरोले यांनी केलेल्या वक्तव्यानतंर टाळ्यांचा कडकडाट झाला होता.

संगमनेर तालुक्यातील कौठे - मलकापूर येथील कारखाना कार्यस्थळावरील भक्तनगर येथे श्री गजानन महाराज साखर कारखान्यांचा २०२३-२४ या वर्षीच्या ७ व्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमात कारखान्याचे संस्थापक चेअरमन रविंद्र बिरोले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अश्विनीताई बिरोले, संचालक शंतनु बिरोले, नंदन बिरोले, संचालक अँड. रामदास शेजुळ, हरिभाऊ गिते, सुभाष कोळसे, केरुबापू मगर, बी. एन. पवार, गोरक्षनाथ डहाळे यांच्यासह श्रीरामपूर, राहुरी, नेवासा येथील ऊस उत्पादक शेतकरी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याआधी सकाळी श्री गजानन महाराज यांची कारखाना कार्यस्थळावर मिरवणूक काढण्यात आली होती. यानंतर तब्बल दोन ते अडीच तास पुजेदरम्यान चाललेल्या मंत्रोच्चारामळे भवतालील वातावरण भक्तिमय झाले होते. याप्रसंगी रविंद्र बिरोले व त्यांच्या पत्नी अश्विनीताई बिरोले यांचे हस्तें विधिवत पुजा विधी पार पडला. 

चेअरमन रविंद्र बिरोले पुढे म्हणाले की, अतिशय संघर्षातून या खडकाळ माळरानावर हा कारखाना सुरु केला असून ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी मंजूर, वाहतूकदार व कारखान्याचे अधिकारी व कामगार यांच्या बळावर आपण ६ गळीत हंगाम यशस्वी पार पाडले आहेत. यावर्षी ही आपण जास्ती जास्त गाळप करण्याच्या दृष्टीने नियोजन करत प्रतिदिन ४ ते साडेचार हजार मेट्रिक टन याप्रमाणे कारखाना चालवणार आहे.

भविष्यात निळवंडे धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून कारखाना परिसरातील गावांमधील शेतात फिरणार असल्याने त्या संधीचे सोनं करण्याची संधी आपल्याला उपलब्ध होणार असल्याने हा परिसर भविष्यात ऊसाचे आगार होणार असल्याचे बिरोले यानी सांगितले. 

तसेच परिसरातील गावांमध्ये विकासाच्या माझ्या विविध योजना आहेत. परंतु त्या योग्य वेळी आपण बोलणार आहोत. बिरोले कुटुंब हे शेतकऱ्याच्या जीवनात विकासाची नवी वाट आणण्याबरोबरचं सामाजिक कार्यासाठी कटीबध्द असून भविष्यात कधीही मी अथवा बिरोले कुटुंबातील कोणताही सदंस्य राजकारणाची पायरी चढणार नसल्याची ग्वाही रविंद्र बिरोले यांनी देऊन कारखाना परिसरासह इतर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. तर दिवाळी निमित्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १०० रुपये देणार असल्याचे शेवटी त्यानी सांगितले.

दरम्यान यावेळी कारखान्याचे संचालक शंतनु बिरोले यांनी मनोगत व्यक्त केले तर भाऊसाहेब मंडलिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी व परिसर व इतर तालुक्यातून आलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !