चिचंपूर शिवारात शॉर्ट - सर्किटमुळे सव्वा दोन एकर ऊस जळला
◻️ शेतकरी पार्वताबाई तांबे यांचे ३ लाखाचे नुकसान
◻️ अर्थिक भरपाई देण्याची स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांची मागणी
संगमनेर LlVE | संगमनेर तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील शेतकरी पार्वताबाई कारभारी तांबे यांचा सुमारे ९० गुंठे ऊस जळून खाक झाला आहे. यामुळे तांबे यांचे अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत स्थानिक नागरिकांनकडून समजलेली माहिती अशी की, चिंचपूर खुर्द गावातील गट नंबर ४० मध्ये पार्वताबाई कारभारी तांबे यांचे ऊसाचे क्षेत्र आहे.
शुक्रवारी अचानक पणे लोळ हवेत दिसू लागल्याने भारत तांबे, नकुल तांबे, रमेश थेटे, बाळासाहेब तांबे, सिताराम ताबे, आप्पासाहेब तांबे, कृष्णा तांबे, रामा सावंत, सागर तांबे, रंगनाथ तांबे, चिमाजी गाडेकर, सागर पवार आदिसह पद्मश्री डाॅ. विखे पाटील कारखान्याच्या आग्नीशामक बंड यांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत ही आग विझवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे परिसरातील ऊस तसेच इतर शेती पिकाची मोठी वित्तहानी टळली आहे.
या घटनेची माहिती मिळताचं महावितरणचा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. तसेच कामगार तलाठी यांना याबाबत माहिती देण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
दरम्यान शेतकरी पार्वतीबाई तांबे यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले असून त्यांना अर्थिक भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.