विखे पाटील परिवार हा राजकारणी नव्हे तर समाजकारणी - सौ. शालिनीताई विखे पाटील
◻️ प्रतापपूर येथे सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते साखर वाटप
◻️ ना. विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील करत असलेल्या कामाचा मांडला लेखाजोखा
संगमनेर LIVE | राज्य सरकार दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा देणार असल्याने त्याबरोबर नागरिकांना ५ किलो साखर दिली तर त्याच्यां आनंदात भर पडेल या भावनेतून नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघातील रेशनकार्ड धारक प्रत्येक कुटुंबाला ५ किलो साखर मोफत देऊन त्यांची दिवाळी गोड केली आहे. ‘भक्ती पिठ ते शक्तीपीठ यात्रा’ हा उपक्रम निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेले नसून हा पद्मश्रीनी घालून दिलेला वारसा विखे पाटील कुटुंब पुढे सुरु ठेवला आहे. त्यामुळे विखे पाटील कुटुंब हे राजकारणी नसून समाजकारणी असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले आहे.
शिर्डी मतदार संघातील व संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर, चिचंपूर, दाढ खुर्द, उंबरी बाळापूर, आश्वी खुर्द, आश्वी बुद्रक, सादतपूर, तसेच चणेगाव, झरेकाठी, खळी, पिंप्री लौकी अजमपूर, पानोडी, शिबलापूर, हंगेवाडी, शेडगाव या गावांमध्ये विखे पाटील कुटुंबियांच्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून साखर वाटप करण्यात आले. यावेळी प्रतापपूर येथे मार्गदर्शन करताना सौ. शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते सुखदेव गंगाराम आंधळे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ नेते भगवानराव इलग यांनी केले आहे. तसेच चिचंपूर येथे आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे यांनी केले.
सौ. विखे पुढे म्हणाल्या की, समाजामध्ये राहून समाजाच्या अडी - अडचणी सोडविण्याचा विखे पाटील कुटुंबाचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे आम्ही करत असलेल्या चांगल्या कामाला त्रास देण्याचे काम विरोधकाकडून सुरू असल्याची खरमरीत टीका सौ. विखे यांनी केली. वयोश्री योजने बाबत सांगताना देशासाठी मजूंर असलेल्या १०० कोटी निधी पैकी ५० ते ६० कोटींचा निधी एकट्या अहमदनगर जिल्ह्यासाठी खा. सुजय विखे यानी आणत चांगल्या गुणवत्तेच्या २५ वस्तूंचे लाभार्थ्यांना वाटप केले. तर कोरोना काळात कोणी - कोणाशी बोलत नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आठशे ते नऊशे रुपये किंमतीची लस मोफत दिल्याचे सांगितले.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना ज्या - ज्या पदावर काम करण्याची संधी मिळाली त्या पदाचा वापर त्यांनी जनतेसाठी केला असे सांगताना नामदार साहेब यांना शिक्षण खात्याचे मंत्री झाल्यानंतर दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी ‘एटीकेटी’ची सुरवात केली. परिवहन खात्याचे मंत्री झाल्यानंतर राज्याबरोबरचं नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नवीन बस स्थानके बांधली तर नव्या बस देखील विकत घेतल्या. विधी व न्याय खात्याचे मंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी नवीन न्यायालये बांधली. कृषी खात्याचे मंत्री झाल्यानंतर पिक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार दिला तसेच ‘एक खिडकी योजने’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर थेट खते पोहचवण्याचे काम केले.
आता महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचे मंत्री झाल्यानंतर सहाशे रुपये ब्रास ने वाळू उपलब्ध करुन दिली. तसेच लपी सारख्या आजवर जनावरांसाठी मोफत लस उपलब्ध करुन देत दूध दरवाढीचे प्रयत्न सुरू असल्याचे सौ. विखे पाटील यांनी सांगितले आहे.
यावेळी प्रतापपूर येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी सरपंच पांडुरंग आंधळे, दत्तात्रय आंधळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब सांगळे, सोसायटीचे चेअरमन गजानन आव्हाड, व्हा चेअरमन सखाराम आंधळे, पोलीस पाटील विठ्ठलराव आंधळे, मुरलीधर आंधळे, ट्रक सोसायटीचे संचालक शिवाजीराव इलग, उपसरपंच सौ. शोभा आंधळे, रंगनाथ आंधळे, रंभाजी इलग, प्रा. बाळासाहेब आंधळे, कचेश्वर आंधळे, प्रा. प्रभाकर सांगळे आदि उपस्थित होते.