◻️ह. भ. प. दत्तगीरी महाराज व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे राहणार उपस्थित
◻️ नागरीकाच्या सुरक्षेची काळजी घेत होणार उपचार
संगमनेर LIVE | संगमनेर शहरात प्रथमचं सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा युक्त श्री साईनाथ दातांचा दवाखान्याचे उद्या मंगळवार दि. १४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता ह. भ. प. दत्तगीरी महाराज व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हस्ते लोकार्पण होणार आहे. शहरातील महत्त्वाच्या अशा नविन नगर रोड नजिक असलेल्या ताजणे मळा येथिल पानसरे हॉस्पिटल लगत श्री साईनाथ दातांच्या दवाखाना आपल्या समस्यांचे समाधान करण्यासाठी तयार असणार आहे.
दात दुखणे, तुटलेला दात, रुट कनाल, दात हलतोय, अक्कल दाढ काढणे, लहान मुलांच्या दातांचे विविध आजार यासंदर्भातील रुग्णावर उपचार केले जाणार असून व्यक्तीचे दात, हिरड्या, तोंड आणि जबडा यांच्याशी संबंधित परिस्थितींचे निदान, उपचार आणि प्रतिबंध, हिरड्यांशी संबंधित बॅक्टेरिया आदि समस्यावर अत्याधुनिक साधन साहित्याद्वारे उपचार केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दंत आरोग्य चांगले राहावे यासाठी सावधगिरीचे उपाय आणि आपले तोंडी आरोग्य राखण्यासाठी एकदा रुग्णालयाला भेट द्या. असे आवाहन डॉ. कांचन कैलास सहाणे यांनी केले आहे.
या उध्दघाटन सोहळ्यासाठी तालुक्यातील नामवंत पाहुणे तसेच नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित राहणार असून या सोहळ्याला नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कैलास सयाजी सहाणे, सौ. सरस्वती कैलास सहाणे, विक्रांत कैलास सहाणे, डॉ. कांचन कैलास सहाणे आदींनी केले आहे.
दरम्यान सर्वोत्तम दंत उपचार आणि सर्व दातांच्या गरजा एकाच छताखाली अत्याधुनिक नवीनतम तंत्रज्ञान वापरून पुर्ण केल्या जाणार असल्याने संगमनेर शहरातील व तालुक्यातील नागरिकांसाठी विश्वासाचे ठिकाण होणार असल्याने उपचारासाठी पुणे, मुंबई, नाशिक सारख्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही.