आश्वी बुद्रकचा विकास रथ दुप्पट वेगाने पुढे घेऊन जाणार - सौ. अरुणा हिंगे

संगमनेर Live
0
आश्वी बुद्रकचा विकास रथ दुप्पट वेगाने पुढे घेऊन जाणार - सौ. अरुणा हिंगे

◻️ आ. थोराताच्या स्विय साहयकाची पत्नी झाली आश्वी बुद्रकची उपसरपंच!

◻️ राजकीय खेळी करण्यात विजय हिंगे पुन्हा ठरले विरोधकांना वरचढ!

संगमनेर LlVE | संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील अतिशय महत्त्वाच्या तसेच प्रतिष्ठेच्या अशा आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. अरुणा विजय हिंगे या विजयी झाल्या आहेत. सौ. अरुणा हिंगे या माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्विय सहायक विजय हिंगे यांच्या पत्नी आहेत. विजय हिंगे यांच्यावर मागील आठवड्यातच विरोधकांकडून बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या संचामध्ये अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या उपसरपंच निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीचा लोकनियुक्त सरपंच पदा सह पंधरा सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली. या चुरशीच्या झालेल्या लढतीत सत्ताधारी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात प्रणित  आम्रेश्वर ग्राम विकास मंडळाने सरपंच पदासह नऊ जागा जिकंत एकहाती मैदान मारले होते. त्यामुळे महसुल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्‍ण विखे पाटील प्रणित जनसेवा मंडळाला अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागेल होते. 

गुरुवार दि. २३ नोव्हेंबर रोजी उपसरपंच पदाची निवडणूक लोकनियुक्त सरपंच नामदेव किसन शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाली. यावेळी उपसरपंच पदासाठी आम्रेश्वर ग्राम विकास मंडळाकडून सौ. दर्शना संतोष ताजणे व सौ. अरुणा विजय हिंगे यांनी तर जनसेवा मंडळाकडून भाऊसाहेब तात्यासाहेब खेमनर यांनी अर्ज दाखल केले होते. दर्शना ताजणे यांनी माघार घेतल्याने सौ. हिंगे व खेमनर यांच्यात निवडणूक झाली. यावेळी झालेल्या निवडणुकीत भाऊसाहेब खेमनर यांना सहा मते पडली व सौ. अरुणा हिंगे या दहा मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या व उपसरपंच पदाची माळ त्याच्या गळ्यात पडली आहे. 

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी काम पाहिले. त्याना कामगार तलाठी डी. बी. भालचिम यांनी सहकार्य केले. यावेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी आश्वी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

निवडीनंतर सौ. अरुणा हिंगे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तर आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वी बुद्रकचा विकास रथ दुप्पट वेगाने पुढे घेऊन जाण्याची ग्वाही नुतन उपसरपंच सौ. अरुणा हिंगे यांनी दिली आहे.

दरम्यान माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्विय सहायक विजय हिंगे यांच्याविरोधात मागील आठवड्यात विरोधकांनी राजकीय कोंडी करत राज्य सरकार बांधकाम कामगारांना देत असलेल्या संचामध्ये अफरातफरी केल्याचा आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे उपसरपंच निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. यावेळी ही राजकीय खेळी करण्यात विजय हिंगे पुन्हा विरोधकांना वरचढ ठरल्याची चर्चा मात्र जोरदार सुरू होती.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !