जेष्ठाचे मार्गदर्शनाखाली तरुणाना एकत्र करुन विकासाचा नवा पॅटर्न राबवणार - भवर
◻️ आश्वी खुर्द च्या उपसरपंचपदी बाबासाहेब भवर
संगमनेर LlVE | शिर्डी मतदारसंघातील व संगमनेर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या आश्वी खुर्द ग्रामपंचायतीची नुकती निवडणूक झाली असून यात राज्याचे महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्तां असून सरपंचपदी सौ. अलका बापूसाहेब गायकवाड या निवडून आल्या आहे. सौ. अलका गायकवाड या महसूल मंत्री ना. विखे पाटील यांचे स्विय सहायक बापूसाहेब गायकवाड यांच्या पत्नी आहेत.
गुरुवारी दि. २३ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीत उपसरपंच पदाची निवड प्रक्रीया पार पडली असून यावेळी झाले निवड प्रक्रियेत बाबासाहेब भवर यांची उपसरपंच पदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी झालेली निवडणूक प्रक्रीया प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ. अलका गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नुतन ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीवेळी शांततेत पार पडली.
याप्रसंगी जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलराव गायकवाड, सोपान सोनवणे, सागर भडकवाड, संजय भोसले, सौ. सुवर्ण सातपुते, सौ. कल्पना क्षिरसागर, सौ. जनाबाई शिंदे, सौ. आशा मुन्तोडे, सौ. गुलजान सय्यद, सौ. संगिता बर्डे उपस्थित होते. जेष्ठाचे मार्गदर्शनाखाली तरुणाना एकत्र करुन विकासाचा नवा पॅटर्न राबवणार असल्याची ग्वाही नुतन उपसरपंच बाळासाहेब भवर यांनी दिली आहे.
दरम्यान नुतन सरपंच व उपसरपंच यांचे राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, युवा खासदार सुजय विखे पाटील, जेष्ठ नेते आण्णासाहेब भोसले, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. कांचनताई मांढरे, कारखान्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, बाळासाहेब मांढरे, मकरंद गुणे, बापुसाहेब गायकवाड, अँड. अनिल भोसले तसेच ना. विखे पाटील यांचे स्विय सहाय्यक बापुसाहेब गायकवाड, विजय गायकवाड, माजी उपसरपंच संजय गायकवाड आदिनी अभिनदंन करत शुभेच्छा दिल्या आहेत.