आपल्या हक्काच्या कारखान्याच्या पाठीशी ठाम पणे उभे रहा - रविंद्र बिरोले
◻️ श्री गजानन महाराज शुगर लि. च्या सातव्या गळीत हंगामाला सुरवात
संगमनेर LlVE | यंदा पाऊस कमी झाल्यामुळे संपुर्ण राज्यात ऊसाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा बिकट परिस्थितीतही केवळ शेतकरी केंद्रस्थानी ठेवून सातव्या गळीत हंगामास कारखान्याने सुरवात केली आहे. ‘अमुक कारखान्याने तमुक भाव दिला’ या मृगजळामागे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी धावल्यास कोणाचेही भल्ल होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या कारखान्याशी पाठीशी ठाम पणे उभे राहण्याची गरज असल्याचे आवाहन चेअरमन रविंद्र बिरोल यांनी करुन इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊसाला दर देण्याची ग्वाही दिली आहे.
संगमनेर तालुक्यातील कौठे - मलकापूर येथिल श्री गजानन महाराज शुगर लि. चा सन २०२३-२४ चा सातव्या गळीत हंगामाचा ऊसाची मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना कारखाण्याचे संस्थापक चेअरमन रविंद्र बिरोले बोलत होते. यावेळी नंदन बिरोले, हरिभाऊ गिते, अँड. रामदास शेजुळ, केरुबापू मगर, सुभाष कोळसे, एकनाथ नांगरे, बी. एन. पवार, भाऊसाहेब मंडलिक, गोरक्षनाथ डहाळे आदि उपस्थित होते.
रविंद्र बिरोल पुढे म्हणाले की, श्री गजानन महाराज शुगर लि. ने मागील सहा गळीत हंगाम यशस्वी व विक्रमी गाळप करत पुर्ण केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यानमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पारदर्शक वजन, योग्य भाव, ऊसाचे पैसे मिळण्याची खात्री, मागेल त्याला तोड यामुळे राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, पारनेर, वैजापूर, निफाड, गंगापूर आदि ठिकाणाहून कारखाण्याला ऊस घालण्याकडे शेतकऱ्याचा कल वाढला आहे. असे सांगून टाकळीभान गटातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे बिरोल यांनी विशेष कौतुक केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यांशी प्रामाणिक राहण्याचे आवाहन करुन दीपावलीनिमित्त कारखाना परिसरातील शेतकऱ्यांना राहिलेले १०० रुपये देणार असल्याचे सांगून उपस्थिताना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान या गळीत हंगाम शुंभारभं प्रसंगी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी याच्यासह सभासद, ऊस उत्पादक, परिसरातील शेतकरी बांधव व पंचक्रोशीतील नागरीकानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.