नगर नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती द्यावी

संगमनेर Live
0
◻️ भंडारदरा, प्रवरा पाणी हितसंवर्धन समितीची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

◻️ न्यायालयात दाद मागण्याची समितीची तयारी

संगमनेर LlVE (लोणी) | मेंढेगिरी समितीचे निकष पुर्ण करण्‍यासाठी गोदावरी, प्रवरा व मुळा धरण समुहातून सोडण्‍यात येणारे पाणी अत्‍यंत कमी असल्‍याने पाण्‍याचा अपव्‍यय होण्‍याची शक्‍यता गृहीत धरुन, तसेच धरणांच्‍या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्‍या जीवन मरणाचा प्रश्‍न गांभीर्याने विचारत घेवून नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून पाणी सोडण्यात येवू नये आशी मागणी भंडारदरा, प्रवरा पाणी हितसंवर्धन समितीच्‍या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्‍याच्‍या काढलेल्‍या आदेशाच्‍या पार्श्‍वभूमीवर या समितीच्‍या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून निवेदनाव्‍दारे पाणी न सोडण्‍याची मागणी केली आहे. भंडारदरा - प्रवरा पाणी हितसंर्वधन समितीचे अध्‍यक्ष व प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ. भास्‍करराव खर्डे पाटील यांच्‍या नेतृत्‍वखाली हितसंर्वधन समितिचे सदस्य डॉ. विखे पाटील कारखान्‍याचे चेअरमन कैलासराव तांबे, प्रवरा बॅकेचे व्‍हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, अॅड. सोपान गोरे, सुभाष अंत्रे, निवृत अभियंता उतमराव निर्मळ, प्रकाश खर्डे, प्रमोद राहाणे आदी यावेळी उपस्थित होते.

या संदर्भात समितीच्या सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून नगर जिल्ह्यातील धरणाच्या पाणी साठ्याची सद्यस्थितीची माहीती दिली. उर्ध्‍व धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला असल्याने केवळ मागील पाणीसाठा शिल्‍लक राहील्‍यामुळेच धरणं पुर्ण क्षमतेने भरली. धरणाच्‍या लाभक्षेत्रातही सरासरी पेक्षा कमी झालेला पाऊसाबाबतही शिष्टमंडळाने अवगत केले. यंदाचा खरीप हंगामही वाया गेला. आता खरीप हंगामातही पाण्‍याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्‍याने कृषि व्‍यवस्‍था व पशुधनाच्‍या संदर्भातील प्रश्‍न अधिकच बिकट होण्‍यार असल्‍याचे गांभीर्य शिष्‍टमंडळाने उपमुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले.

केवळ कायद्याची अंमलबजावणी करण्‍याच्‍या हेतूने व दबावाने पाणी सोडण्‍याचा निर्णय घेण्‍यापेक्षा उपलब्‍ध पाणी साठ्याचा कार्यक्षम वापर करुन, एक टिएमसी पाण्‍यात उध्‍वभागात किती सिंचन केले जाते व जायकवाडी धरणात एक टिएमसी पाण्‍यात किती क्षेत्र सिंचित होते याबाबतही तुलनात्‍मक विचार करण्‍याची गरज या निवेदनात व्‍यक्‍त  करतानाच जायकवाडी जलाशयातून केला जाणारा अनियंत्रित उपसा व कालव्‍यांधून होणारी गळती यामुळे वाया जाणाऱ्या पाण्‍याकडेही लक्ष देण्‍याची आवश्‍यकता या समितीच्‍या वतीने निवेदनाव्‍दारे व्‍यक्‍त करण्‍यात आली आहे.

घाटमाथ्‍यावरील पाऊस पुर्णपणे थांबलेला आहे. त्‍यामुळे आता वरच्‍या धरणात पाण्‍याची आवक होण्‍याची कोणतीही शक्‍यता नाही. त्‍यामुळे उर्ध्‍वभागात तिव्र टंचाईच्‍या काळात पाणी उपलब्‍ध होणार नाही. याउलट जायकवाडी धरणात २६ टिएमसी मृत पाणीसाठा उपलब्‍ध असल्‍याने यासाठ्यातून पाणी उपलब्‍ध होवू शकते, यापुर्वीही असा वापर केलेला आहे याकडे लक्ष वेधून समितीने महाराष्‍ट्र जलसंपत्‍ती  प्राधि‍करणाकडून न्‍यायालयाच्‍या निर्देशाप्रमाणे कोणत्‍याही अटी व शर्थीचे पालन न करता केवळ पाणी सोडले जात असल्‍यामुळे नगर, नाशिकच्‍या शेतकऱ्यांवर एकप्रकारे अन्‍यायच होत असल्याची बाब निवेदनातून समितीने अधोरेखीत केली. 

समन्‍यायी पाणी वाटपाचा आग्रह धरणे म्‍हणजे पाण्‍याच्‍या उधळपट्टीला एकप्रकारे प्रोत्‍साहन देण्‍यासारखी असल्‍याची बाबही  मांडली असल्याची माहीती समितीचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे पाटील यांनी दिली. याबबात न्यायालयातही दाद मागण्याची समितीची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबबात सर्व वस्तूस्थिती तपासून घेण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !