◻️ अपक्ष उमेदवारानी निकालाआधी दोन्ही गटातील उमेदवारांची धाकधूक वाढवली
◻️ सोमवारी दुपारपर्यत लागणाऱ्या निकालाची उत्कंठा शिगेला
संगमनेर LlVE | संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील अतिशय प्रतिष्ठेच्या व संवेदनशील अशा आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी ७८ टक्के तर आश्वी खुर्द ग्रामपंचायतीसाठी ८१ टक्के मतदान प्रक्रिया रविवारी शांततेत पार पडली.
या पंचवार्षीक ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात याच्यां समर्थक गटामध्ये अटीतटीच्या व तुल्यबळ लढत झाल्यामुळे या दोन्ही गावानाचं नव्हे तर तालुक्याला निकालाची प्रतिक्षा लागली आहे.
आश्वी बुद्रुक येथे सरपंच पद अनुसूचित जमाती व्यक्ती साठी राखीव असल्याने अपक्ष उमेदवारसह तिरंगी लढत झाली. तर आश्वी खुर्द येथे सरपंच पद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने या ठिकाणी अपक्ष उमेदवाराने रंगतदार लढत देऊन निकालाची उत्कंठा वाढवली आहे.
आश्वी बुद्रुंक ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदासाठी जनसेवा मंडळाकडून आश्वी बुद्रुंक येथिल नामदार विखेचे निष्ठावान व विश्वासू कार्यकर्ते रविंद्र सुभाष बर्डे यांना तर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अमरेश्वर शेतकरी विकास मंडळाकडून ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी नामदेव किसन शिंदे यांना लोकनियुक्तं सरपंच पदाची उमेदवारी देण्यात आली होती. तर सरपंच पदासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य तान्हाजी नागरे यांनीही अपक्ष उमेदवारी करत निवडणूकीत रंगत निर्माण केली.
आश्वी खुर्द लोकनियुक्त सरपंच पदासाठी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील गटाकडून सौ. आलका बापुसाहेब गायकवाड आणि माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात गटाकडून सौ. शालीनी दत्तात्रय सोनवणे तसेच अपक्ष उमेदवार सौ. सोनाली मोहित गायकवाड यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे निवडणूक अटीतटीची झाल्याची चिन्हे आहेत.
आश्वी बुद्रुंक ग्रामपंचायतीवर सध्या थोरात गटाची सत्तां असून सरपंच पदासह सर्व संदस्य निवडून आणत सत्तां आपल्याकडे ठेवण्याची व्युहरचना थोरात समर्थकानी केली आहे. दुसरीकडे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील गटाचे कार्यकर्तेही मोठ्या उत्सहाने सत्ता आपल्याकडेचं खेचुन आणण्यासाठी त्यानीही आपली सर्व यंत्राणा कामाला लावली होती. आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवर ना. राधाकृष्ण विखे पाटील गटाची सत्ता असून तेथे सत्ता परिवर्तन करण्यासाठी आ. थोरात गटाने कंबर कसल्याचे पहावयास मिळाले.
दरम्यान सोमवारी दुपारपर्यत गुलाल कोण उंधळणार हे स्पष्ट होणार असले तरी दोन्ही गटातील कार्यकर्त्यानी विजयाचा दावा केल्यामुळे लागणाऱ्या निवडणूक निकालाकडे स्थानिक नागरिकासह तालुक्यातील नागरीकांचे लक्ष लागले
दोन्ही ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे.. (कंसातील आकडेवारी एकून मतदानाची आहे)
आश्वी बुद्रक ग्रामपंचायत मतदान आकडेवारी..
प्रभाग क्रमांक १ :- ७१९ (९५६), प्रभाग क्रमांक २ :- ८०४ (१०३९), प्रभाग क्रमांक ३ :- १११७ (१३९२), प्रभाग क्रमांक ४ :- ८६५ (१०६२), प्रभाग क्रमांक ५ :- ७१५ (९५२) याप्रमाणे ४ हजार २२१ (५ हजार ४०१) नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावल्यामुळे ७८ टक्के मतदान झाले आहे.
आश्वी खुर्द ग्रामपंचायत मतदान आकडेवारी..
प्रभाग क्रमांक १ :- ५१९ (६४७), प्रभाग क्रमांक २ :- ६८३ (८२८), प्रभाग क्रमांक ३ :- ७२६ (९४१), प्रभाग क्रमांक ४ :- ७६१ (८९५) याप्रमाणे २ हजार ६८९ (३ हजार ३११) नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावल्यामुळे ८१ टक्के मतदान झाले आहे.