आजी माजी महसूल मंत्र्यांच्या स्विय सहायकानी आप - आपले गड राखले !
◻️ आश्वी बुद्रक ग्रामपंचायतीवर माजी मंत्री आ. थोरात गटाचा तर आश्वी खुर्द येथे मंत्री ना. विखे पाटील गटाचा झेंडा
◻️ आश्वी बुद्रक येथे आ. थोरात गटाचा सरपंच पदाचा उमेदवार अवघ्या १२ मतांनी विजयी
◻️ गाव विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची विजयी उमेदवाराची ग्वाही
संगमनेर LlVE | संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदारसंघातील अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आजी माजी महसूल मंत्र्यांच्या स्विय सहायकानी आप - आपले गड राखले असून आश्वी बुद्रक ग्रामपंचायतीत १५ जागांपैकी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात गटाचे सरपंच व सदंस्य पदाचे ९ व विखे पाटील गटाचे ६ उमेदवार विजयी झाले. तर आश्वी खुर्द ग्रामपंचायतीत ११ जागांपैकी महसूलमंत्री ना. विखे पाटील गटाचे सरपंच पदासह १० सदस्य तर आ. थोरात गटाचा एक उमेदवार विजयी झाले आहेत.
आश्वी बुद्रक येथे झालेल्या अटीतटीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत आ. बाळासाहेब थोरात यांचे स्विय सहायक विजय हिंगे यांनी ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी नामदेव किसन शिंदे (२ हजार ३४ मते) यांना निवडून आणल्यामुळे ना. विखे गटाचे रविंद्र सुभाष बर्डे (२ हजार २२ मते) व अपक्ष उमेदवार तान्हाजी रघुनाथ नांगरे (१२४ मते) हे पराभूत झाले आहेत तर याठिकाणी २७ मते हे नोटाला मिळाली आहेत.
आश्वी खुर्द येथे झालेल्या सरपंच पदासाठीच्या रंगतदार लढतीत ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्विय सहायक बापूसाहेब गायकवाड यांच्या पत्नी सौ. अलका बापूसाहेब गायकवाड (१ हजार १६५ मते) या विजयी झाल्यामुळे आ. थोरात गटाच्या सौ. शालिनी दत्तात्रय सोनवणे (३८९ मते) व अपक्ष उमेदवार सौ. सोनाली मोहित गायकवाड (१ हजार ११९ मते) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर याठिकाणी १६ मते ही नोटाला मिळाली आहेत.
दरम्यान आश्वी बुद्रक येथे अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत आ. थोरात गटाचा सरपंच पदाचा उमेदवार अवघ्या १२ मतांनी निवडून आला असून आश्वी खुर्द येथे विखे गट व अपक्ष यांच्या तुल्यबळ लढतीत ४६ मतांनी ना. विखे पाटील गटाचा सरपंच पदाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर थोरात गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार याठिकाणी आकड्यांच्या गणितात तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या आहे. यावेळी दोन्ही गावांमध्ये विजयी झालेल्या सरपंच व सदंस्य पदाच्या उमेदवाराची फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली असून गाव विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विजयी उमेदवारानी दिली आहे.
आश्वी बुद्रक ग्रामपंचायत येथिल विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :-
प्रभाग क्रमांक १ मधून :- अझरुद्दीन सिकंदर शेख (३०८ मते), जयश्री विजय केदारी (३९८ मते), अरुणा विजय उर्फ पांडुरंग हिंगे (४१२ मते) विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक २ मधून :- भाऊसाहेब तात्यासाहेब खेमनर (४९१ मते), मीना आंतोन गायकवाड (४५९ मते), सारीका विशाल पाटील (४१७ मते) विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक ३ मधून :- अनिल राधाकिसन कगंणकर (६७६ मते), बाळासाहेब नानासाहेब मदने (५७२), बिजयाबाई भास्कर मोरे (५८१ मते) विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक ४ मधून :- अविनाश गिताराम गायकवाड (४९२ मते), बबनराव भाऊराया शिंदे (४३९ मते), पुजा राहुल राखपसरे (४२९ मते) विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक ५ मधून :- अभिजित शंकर ताजणे (३९५ मते), दर्शना संतोष ताजणे (४१६ मते), परीगा बाबासाहेब गायकवाड (३९७ मते) विजयी झाले आहेत.
आश्वी खुर्द ग्रामपंचायत येथिल विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :-
प्रभाग क्रमांक १ मधून :- सौ. सुवर्णा राजेंद्र सातपुते (३२७ मते), कल्पना सचिन क्षिरसागर (३०१ मते) विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक २ मधून :- सागर दिनकर भडकवाड (३२२ मते), विठ्ठल बजाबा गायकवाड (२८१ मते), गुलनाज कमाल सय्यद (३३९ मते) विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक ३ मधून :- संजय गबाजी भोसले (३७४ मते), आशा बंडू मुन्तोडे (४४९ मते), जनाबाई देवराम शिंदे (४८० मते) विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक ४ मधून :- बाबासाहेब प्रताप भवर (४१९ मते), सोपान मधुकर सोनवणे (२९८ मते), संगिता दत्तात्रय बर्डे (३७४ मते) विजयी झाले आहेत.