आश्वी खुर्द सहकारी दूध उत्पादक संस्थेकडून सभासदांच्या खात्यात ६३ लाख वर्ग
◻ आश्वी खुर्द येथील दूध उत्पादकासह व्यापारीवर्गाची दिवाळी गोड
संगमनेर LlVE | संगमनेर तालुक्यात दूध उत्पादन क्षेत्रात अग्रगण्य असलेली व आश्वी खुर्द परिसराची कामधेनू म्हणून नावारुपाला आलेल्या आश्वी खुर्द सहकारी दूध उत्पादक संस्थेकडुन दिपावली सणानिमित्त दुध उत्पादक सभासदाच्या बँक खात्यात ६२ लाख ९३ हजार ८३४ रुपये वर्ग केले असल्याची माहीती संस्थेचे चेअरमन मकरंद गुणे यांनी दिली आहे.
सन १९ ८८ साली आश्वी खुर्द गावातील शेतकऱ्याना एकत्र करुन गावात स्वतःच्या हक्काची दुध उत्पादक संस्था स्थापन करुन आज दैनदिन संकलन ४ हजार लिटर व ४४८ सभासद आहेत. संस्थेकडे स्वंमालकीचे ५ हजार लिटर क्षमतेचे बल्क कुलर आहे.
आश्वी परिसरात दूधाला सर्वाधिक बाजारभाव, अँडव्हासची सोपी पध्दत, पारदर्शक व्यवहार, दूध उत्पादकाच्या हिताला प्राधान्य देणारी संस्था म्हणून संस्थेने शेतकऱ्यानमध्ये विश्वास निर्माण केला आहे.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील जि. प. च्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या आश्वी खुर्द दूध उत्पादक संस्थेकडून गुणवत्तेनुसार दुधाला सर्वाधिक भाव मिळत असल्याने तालुक्यासह जिल्ह्यात या संस्थेकडे मोठ्या अभिमानाने पाहिले जाते.
दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक सभासदाच्या बँक खात्यात ६२ लाख ९३ हजार ८३४ रुपये वर्ग केल्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यानमध्ये आनंदाचे वातावरण असून गावच्या अर्थकारणाला यामुळे गती मिळणार असल्याने व्यापारी वर्गाचा उत्साह दुनावला आहे. संस्थेने दुध अनामत व रिबेट मिळवुन प्रति लिटर ४.२० पैसे व प्रति खाद्य पोते २० रुपये डिव्हीडंट १२ टक्के व वर्षभर नियमित दुध देणाऱ्या उत्पादकास ६ किलो गोडतेल दिले आहे.
दरम्यान संस्थेच्या वाढीसाठी चेअरमन मकरंद गुणे, व्हा. चेअरमन विजय गायकवाड, संचालक संपत गायकवाड, राजेंद्र गायकवाड, अविनाश सोनवणे, विठल मांढरे, अमोल मुन्तोडे, अशोक भोसले, अनिल सोनवणे, नानासाहेब गायकवाड, रामनाथ क्षिरसागर, निलेश भवर, विठल भोसले, देवराम मांढरे, दिलीप वाल्हेकर, रमेंश सिनारे, सौ. रुपाली गडकरी, सौ. पद्मा शिंदे तसेच संस्थेचे सचिव सुनिल मांढरे, कर्मचारी संतोष भवर, काशिनाथ गायकवाड, लक्ष्मण गायकवाड आदिसह दूध उत्पादक शेतकरी परिश्रम घेत आहेत.