◻️ मनोली, रहीमपूर, कोल्हेवाडी, ओझर बुद्रक, ओझर खुर्द, कनकापूर, निंबाळे आणि कनोली या गावांमध्ये दिवाळी सणाचे औचित्य साधून साखर वाटप
◻️ संकटात आणि आनंदात विखे पाटील कुटुंब हे कायमच जनते सोबत
संगमनेर LlVE | शिर्डी मतदार संघ हे आमचे कुटुंब आहे, संकटात आणि आनंदात विखे पाटील कुटुंब हे कायमच आपल्या सोबत आहे. गोरगरीब जनतेला आधार देणे हा वारसा असून तो कायम जतन करण्याची पंरपरा आम्ही पुढे घेवून जात असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
शिर्डी मतदार संघातील व संगमनेर तालुक्यातील जोर्वे गटातील मनोली, रहीमपूर, कोल्हेवाडी, ओझर बुद्रक व ओझर खुर्द, कनकापूर, निंबाळे आणि कनोली या गावांमध्ये विखे पाटील कुटूंबियांच्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून साखर वितरण सुरु करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी प्रातिनिधीक स्वरुपात साखर वाटप करुन, सर्वांना शुभेच्छा दिल्या.
स्वत:साठी जगतांना इतरासाठीही काम करण्याचे संस्कार पद्मश्रींनी दिले. सहकार चळवळीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासतानाच ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करुन घेण्याचे काम लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी केले. हीच परंपरा आम्ही पुढे घेवून जात आहोत. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने विविध पदांवर काम करण्याची मिळणारी संधी ही सामाजिक बांधिलकीत कशी उतरविता येईल हा प्रयत्न आमचा असतो. यामुळे वेगवेगळे उपक्रम मतदार संघातील नागरीकांसाठी आयोजित केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोव्हीड संकटातही जनतेच्या सोबत विखे पाटील कुटूंबिय कायमच राहीले. कोणत्याही सुखदुखात जनतेला साथ देण्याची भूमिका कायम ठेवल्यानेच जनतेची साथही आम्हाला वेळोवेळी मिळत आहे असे स्पष्ट करुन, सौ. विखे पाटील म्हणाल्या की, कोविड काळात मोफत दिलेले उपचार, सिंधु अन्न छत्र, वयोवृद्ध नागरीकांसाठी राबविण्यात आलेली वयोश्री योजना तसेच वैयक्तीक लाभाच्या योजनेचा फायदा यामुळे सर्वानाच मोठा आधार मिळत असल्याचे त्यांनी नमुद केले.