जयहिंदच्या महिला मंचकडून दिवाळीनिमीत्त सैनिकांच्या कुटूंबियांना फराळाचे वाटप
◻️ मा. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील बचत गट व महिला मंडळाचा उपक्रम
◻️ माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात व माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांचे उपक्रमाला पाठबळ
संगमनेर LlVE | देशवासीयांच्या संरक्षणासाठी रात्रं दिवस सीमेवर पहारा देत असलेल्या तालुक्यातील भारतीय सैनिकांच्या कुटूंबियांना काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे व प्रकल्पप्रमुख सौ. दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद महिला मंचच्या भगिनींकडून दिवाळी निमित्त दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले.
यशोधन संपर्क कार्यालयात जयहिंद महिला मंच व स्वराज सैनिक कल्याण संस्था यांच्या वतीने तालुक्यातील आजी - माजी सैनिकांच्या कुटूंबियांना फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मेजर प्रकाश कोटकर, सौ अर्चना बालोडे, वीर माता अलका राहणे, सौ. शीला करंजकर, सुनिता कांदळकर, सौदामिनी कान्होरे, सौ.रोहिणी कोटकर, अनुराधा आहेर, सुनिता राहणे, पुष्पा कोल्हे, सपना पावसे, शीला उगलमुगले, संस्थापक भानुदास कोटकर, सुभाष कोटकर, सुनील थोरात, प्रवीण गुंजाळ, भारत कुटे, संजय अभंग, गिरीश एरंडे, संजय रहाणे, शिवाजी रहाणे ,विक्रम थोरात ,आनंद गीते, शशिकांत कोटकर, लक्ष्मण ढोले, भास्कर सातपुते ,सोमनाथ गुंजाळ, शांताराम गोरे, माधव काकड, मेजर घुले ,बाळू सातपुते आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सौ. अर्चनाताई बालोडे म्हणाल्या कि, भारतीय सैनिक हे कायम आपल्या परीवारापासुन हजारो किलोमीटर दूर असतात. सणासुदीच्या काळातही ते घरी येत नाही. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असतानाही हे सैनिक आपल्या जनतेसाठी कामावर असतात. रात्रंदिवस ऊन, वारा, पाऊस ते डोक्यावर घेऊन आपले कर्तव्य पार पाडत असतात.
ते दिवाळी किंवा सणांना कुटूंबियांसोबत नसतात त्यांच्या प्रति आदर भावना व्यक्त करताना सौ. दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील बचत गट, महिला मंडळ यांच्या कडून सैनिकांना दिवाळी चे विविध फराळाचे पदार्थ उच्च प्रतिच्या पॅकिंगमध्ये त्यांच्या कुटूंबियांना दिले आहेत. या अभिनव उपक्रमात तालुक्यातील अनेक कुटुंबही सहभागी होणार आहे.
सौ. सुनीताताई कांदळकर म्हणाल्या की, मा. महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी कायम सैनिकांचा सन्मान व आदर केला असून त्यांना फराळ पाठविण्याच्या संकल्पचे कौतुक केले आहे.
यावेळी निवृत्त सैनिक प्रकाश कोटकर, शीला करंजेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महिला, कार्यकर्ते, आजी माजी सैनिक व त्यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.