आंतर महाविद्यालयीन संविधान करंडक वादविवाद स्पर्धेचे आयोजन
◻️ भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने २५ व २६ नोव्हेंबर रोजी स्पर्धा रंगणार
◻️ कार्यशाळेत निवडक ६० विद्यार्थ्याना आणि वादविवाद स्पर्धेत २० संघांना सहभागी होता येणार
संगमनेर LIVE (अहमदनगर) | भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयीन स्तरावरील संविधान करंडक वादविवाद स्पर्धेचे आयोजन स्नेहालय संस्थेच्या युवानिर्माण प्रकल्प, उडान प्रकल्प आणि पेमराज सारडामहाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
ही २ दिवसीय वादविवाद स्पर्धा ३३ व्या युवा प्रेरणा कार्यशाळेचा एक भाग असेल. कार्यशाळेत निवडक ६० विद्यार्थ्यांना आणि वादविवाद स्पर्धेत २० संघांना सहभागी होता येईल. येत्या २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८.३० पर्यंत स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, निंबळक, एमआयडीसी अहमदनगर उपस्थित राहायचे आहे. येथे ही स्पर्धा आणि कार्यशाळा होईल.
नगर शहर आणि उपनगरातील विविध चौकातून बालविवाह प्रतिबंधक पदयात्रा या निमित्ताने काढण्यात येईल. समारोप. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी स्नेहालय संकुलात दुपारी ३ वाजता होणार आहे. संविधान करंडक केवळ विजेत्या संघाला मिळणार असून तो फिरत्या स्वरूपात राहील.
स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे प्रथम ५००१/- रु, द्वितीय ३००१/- तृतीय २००१/- रु, तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील.
वादविवाद स्पर्धेचे विषय प्रस्ताव पुढीलप्रमाणे –‘बालविवाह रोखण्यास भारतीय संविधान यशस्वी ठरले आहे.’
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत.
१. प्रथम नोंदणी करणाऱ्या २० संघांना स्पर्धेत सहभागी होता येईल. नोदणी फॉर्म लिंक https://www.snehalaya.org/volunteer-youth-camp
२. प्रत्येक संघातील एका स्पर्धकाने प्रस्तावाच्या बाजूने तर दुसऱ्याने विरुध्द मत प्रदर्शन करणे अपेक्षित आहे.
३. प्रत्येक महाविद्यालयाला एकच संघ स्पर्धेसाठी पाठविता येईल.
४. स्पर्धेसाठी सहभाग शुल्क १०००/- रुपये तर कार्यशाळेसाठी शुल्क १००/- रुपये आहे. हे शुल्क स्पर्धेच्या दिवशी देता येईल. स्पर्धेत भाग घेण्याबाबत येत्या २० नोव्हेंबरपूर्वी युवानिर्माण प्रकल्पाला महाविद्यालयाच्या लेटरहेडवर कळवणे आवश्यक आहे. युवा निर्माण प्रकल्पाचे संपर्क पुढील प्रमाणे आहेत. मो.- ९०११०२६४७२ ईमेल – yuvanirman@snehalaya.org
५. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त ०७ मिनिटे वेळ दिला जाईल. यापेक्षा लांबलेली स्पर्धा बाद ठरवली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
६. येणाऱ्या सर्व संघांची आणि विद्यार्थांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था संयोजकांतर्फे स्नेहालय संस्थेत केली जाईल.
७. उत्कृष्ट वादविवादाचे सादरीकरण स्नेहलयाच्या रेडिओ नगर ९०.४ एफएमवरून प्रसारित करण्यात येईल.
८. प्रत्येकला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
९. समारोपप्रसंगी विजेत्या पहिल्या तीन संघांच्या वादविवादाचे सादरीकरण पारितोषिक वितरणापूर्वी होणार आहे.
१०. स्पर्धेसाठी १५ ते २१ वर्ष या वयोगटात युवक-युवतींचा सहभाग अपेक्षित आहे.
टीप :- विजेत्या संघाना चेक देण्यासाठी ज्या नावे चेक देय आहे त्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे संमतीपत्र सोबत आणावयाचे आहे. (प्राध्यापकंच्या नावे चेक पाहिजे असेल, तर महाविद्यालयाचे संमतीपत्र, महाविद्यालयाचे आय कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक डिटेल (बँक पास बुक) यांची प्रत्येकी २ झेरॉक्स प्रत आणावी.