आश्वी खुर्द येथील नागरिकांना प्राधान्यक्रमाने शासकीय वाळू डेपो तून वाळू द्या!
◻️ सामाजिक कार्यकर्ते मोहित गायकवाड यांची ग्रामसभेत मागणी
संगमनेर LIVE | शासकीय वाळू डेपोचे नुकतेच आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथे उध्दघाटन करण्यात आले आहे. यामध्ये घरकुल आणि शासकीय कामांना पहिल्यांदा वाळू पुरवठा केला जाणार असून त्यानंतर इतरत्र वाळू पुरवठा केला जाणार आहे.
यावेळी प्राधान्यक्रमाने आश्वी खुर्द येथील नागरिकांना शासकीय वाळू डेपोतून वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहित गायकवाड यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत निवेदनाद्वारे केली आहे.
आश्वी खुर्द ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच शांततेत संपन्न झाली. यावेळी दिलेल्या निवेदनात मोहित गायकवाड यांनी वाळू बरोबरचे घरकुल योजना, गावरान जमीन, राष्ट्रीय पेयजल योजना याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाशी चर्चा केली असून शाळा, ग्रामपंचायत कार्यालय व प्रत्येक चौकात सीसीटीव्ही लावून गाव सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मोहित गायकवाड यांच्या मागण्यांवर ग्रामपंचायत कारवाई करुन सर्वसामान्य नागरीकांना दिलास देणार का? याकडे ग्रामस्थाचे लक्ष लागले आहे.