सरपंच व उप सरपंच यांच्या यशस्वी शिष्टाई नंतर रामोशी बांधवांचे उपोषण मागे
◻️ आश्वी खुर्द येथील स्मशानभूमीतील अतिक्रमण काढण्यासाठी सुरू होते उपोषण
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे रामोशी समाजबांधवांची स्मशानभूमी असून ग्रामपंचायतीने स्मशानभूमीत रस्ता करुन अतिक्रमण केल्याचा आरोप रामोशी समाजबांधवांनी करत हे अतिक्रमण तातडीने काढून घ्यावे यासाठी उपोषणाला सुरुवात केली होती. या उपोषणाची तात्काळ लोकनियुक्त सरपंच सौ. अलका गायकवाड व उप सरपंच बाबासाहेब भवर यांनी दखल घेऊन हे उपोषण स्थगित केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आश्वी खुर्द येथिल बाजारतळानजीक रामोशी समाजाची स्मशानभूमी आहे. निवडणूकीपूर्वी ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक पाहत असताना ग्रामपंचायतीने याठिकाणी रस्त्याचे काम केले होते. मात्र हे काम करत असताना ग्रामपंचायतीने अतिक्रमण केले असल्याचा आरोप रामोशी समाजातील महिला व पुरुष यांनी करुन सोमवारी ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण करण्यास सुरुवात केली होती. जोपर्यत ग्रामपंचायत हे अतिक्रमण काढत नाही, तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्यानी घेतला होता.
या उपोषणाची माहिती मिळताच ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन चर्चा करत त्याच्या मागण्या जाणून घेतल्या. याप्रसंगी उपोषणकर्त्याना स्मशानभूमी लगतचे अतिक्रमण काढण्याचे आश्वासन देऊन हे उपोषण स्थगित केले आहे. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी रविंद्र ठाकूर, लोकनियुक्त सरपंच सौ. अलका गायकवाड, उप सरपंच बाबासाहेब भवर, ग्रामविकास अधिकारी प्रविण इल्हे, ग्रामपंचायत सदस्य संजय भोसले, सोपान सोनवणे, जनसेवा कार्यालयाचे बापूसाहेब गायकवाड, दीपक सोनवणे आदिनी हे उपोषण स्थगित व्हावे यासाठी पुढाकार घेतला.
यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते मोहित गायकवाड, विकास गायकवाड, लहुजी सेनेचे महाराष्ट्राचे सचिव संतोष भडकवाड, युन्नुसभाई सय्यद, कैलास गायकवाड, यशवंत वाल्हेकर, मुकेश वाल्हेकर आदींनी उपोषण स्थळी भेट देऊन या उपोषणाला पाठिंबा दिला होता.
दरम्यान याप्रसंगी उपोषणकर्ते विशाल शिरतार, प्रभाकर जेडगुले, सुभाष जेडगुले, पुंजा भडंकर, कृष्णा पवार, विकास भडकवाड, राहुल जेडगुले, दत्ता गोफने, शुभम बोऱ्हाडे, मयुर जेडगुले, संदीप बोऱ्हाडे, संकेत गपले, मारुती गोफने, सुकदेव शिरतार, सौ. शारदा गपले, सौ. बेबीताई चव्हाण, श्रीमती ताराबाई मोरे, चंद्रभागा शिरतार, सौ. अनुसया जेडगुले, विशाल चव्हाण, श्रीमती हिराबाई शिरतार, हौसाबाई जेडगुले, लताबाई शिरतार, शिवनाथ गोफने, बाळासाहेब चव्हाण, रवी शिरतार, सुनीता जेडगुले, पुंजा जेडगुले, पुंजाबाई जेडगुले आदि उपोषण स्थळी उपस्थित होते.