◻️ जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार उद्या वितरण व गौरव
संगमनेर LlVE | पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कैलास सूर्यभान पाटील तांबे यांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान यांच्यावतीने ‘राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार २०२३’ हा जाहीर झाला असून जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे तसेच आदर्श गाव हिवरे बाजारचे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण उद्या रविवारी दि. ३ डिसेंबर रोजी होणार आहे. या पुरस्कारांची माहिती मिळताच त्याच्यां संगमनेर तालुक्यातील चिचंपूर गावात जल्लोष करण्यात आला असून त्याच्यावर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चिचंपूर येथिल कैलास तांबे हे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे विश्वासू सहकारी आहेत. राजकारणासह समाजकारणात त्याचे मोठे काम असून वेगवेगळ्या पदांवर काम करण्याचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. तसेच चिचंपूर पंचक्रोशीत प्रगतशील शेतकरी म्हणून देखिल ते प्रसिद्ध असून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे ते विद्यमान चेअरमन आहेत.
शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे ते धार्मिक वृत्तीचे असल्याने सरला बेटांचे महंत रामगिरी महाराज, हभंप रामराव महाराज ढोक व उध्दव महाराज मंडलिक यांचे आशीर्वाद सदैव त्याच्यां पाठीशी असल्याचे कैलास तांबे सांगतात. वडील कै. सुर्यभान पाटील तांबे यांच्याकडून समाजकारण व राजकारणाचे बाळकडू मिळाल्यामुळेचं हे यश संपदित करू शकले आहेत.
दरम्यान रविवार दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे होणाऱ्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान यांच्यावतीने ‘राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार २०२३’ त्यांना प्रदान केला जाणार असून यामध्ये संगमनेर तालुक्यातील व उंबरी बाळापूर येथील पंचायत समितीचे माजी सदस्य सरुनाथ उंबरकर व तळेगाव दिघे येथील आदर्श प्राचार्य हरिभाऊ दिघे यांचा देखिल समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र विखे पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन सतिषराव ससाणे, मांचीहिल शिक्षण संकुलाचे संस्थापक शाळीग्राम होडगर, आश्वी परिसराचे जेष्ठ नेते भगवानराव इलग, माजी जिल्हा परिषद सदस्या रोहीनीताई किशोर निघते, कांचनताई मांढरे, कारखान्याचे संचालक रामभाऊ भुसाळ,
डॉ. दिनकर गायकवाड, शांताराम जोरी, प्रवरा बॅकेचे चेअरमन भास्करराव खर्डे, व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, ट्रक वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदूशेठ राठी, संचालक शिवाजीराव इलग, अॅड. अनिल भोसले, जोर्वेचे माजी उपसरपंच गोकुळ दिघे, दाढ खुर्दचे सरपंच सतिष जोशी, आश्वी खुर्दच्या सरपंच सौ. अलका बापूसाहेब गायकवाड, चिचंपूर येथिल गिताराम तांबे, लक्ष्मणराव तांबे, शत्रुघ्न तांबे, शंकरराव तांबे, गिताराम पवार, गंजाबा तांबे आदिसह ग्रामस्थ व आजी माजी पदाधिकारी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छां दिल्या आहेत.
कैलास तांबे यांनी भुषविलेली पदे...
२००५ साली ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरवात केल्यानंतर कैलास तांबे यांनी मागे वळून पाहिले नाही. चिचंपूर गावचे सरपंच, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक, संंगमनेर पंचायत समिती सदस्य, अहमदनगर जिल्हा आत्मा समिती सदस्य, पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक व व्हा. चेअरमन आता कारखान्याचे विद्यमान चेअरमन, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक, दुधेश्वर उपसा जलसिंचन योजना चिचंपूर चेअरमन तसेच राज्य राज्यपातळीवरील ऊस दर नियंत्रण समितीत साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून देखील त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
ना. राधाकृष्ण विखे पाटील व विखे पाटील कुटुंबामुळे राज्यपातळीवर तसेच जिल्ह्यातील अतिमहत्त्वाच्या अशा पदांवर काम करण्याची संधी मिळाली. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाल्यामुळे सामाजिक काम करण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे. अशा भावना पुरस्कार्थी कैलास तांबे यांनी व्यक्त केल्या आहेत.