आश्वी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांची बदली
◻️ निरोप समारंभावेळी कर्मचारी झाले भावुक
संगमनेर LIVE | आश्वी पोलीस ठाणे येथील गोपनीय विभागाचे पोलीस नाईक विनोद गंभिरे व हवालदार हुसेन शेख यांची इतरत्र बदली झाली असून त्याचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याची बदली हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी बदली झालेले दोन्ही पोलीस कर्मचारी व यावेळी उपस्थित नागरिक भावुक झाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.
पोलीस नाईक विनोद गंभिरे यांची राहाता व हवालदार हुसेन शेख यांची अकोले येथे बदली झाली आहे. शुक्रवारी आश्वी पोलीस ठाणे येथे त्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. सहकाऱ्याचे आपल्याप्रती असलेले प्रेम आणि आपुलकी पाहून गंभिरे व शेख भावुक झाले होते. लोकांशी थेट संपर्क असल्यामुळे आश्वी परिसरातील गावातील नागरिकांशी त्यांचे जीव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. त्यामुळे निरोप समारंभावेळी दोन्ही पोलीस कर्मचारी चांगलेच भावुक झालेले पहावयास मिळाले.
दरम्यान याप्रसंगी पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोकराव थेटे, विठ्ठलराव आंधळे, नानासाहेब वर्पे, वैशाली मैड, पोलीस कर्मचारी अशोक शिंदे, रवींद्र वाकचौरे, राजेंद्र पारधी, शांताराम झोडगे, प्रवीण रणधीर, स्वाती ताजणे, संगिता खेमनर, आनंद वाघ, प्रसाद सोनवणे यांच्यासह पत्रकार संजय गायकवाड, रवींद्र बालोटे, योगेश रातडीया, राजेश गायकवाड, अनिल शेळके, सुनील गायकवाड, राजेंद्र गायकवाड, विजय क्षिरसागर, युन्नुस सय्यद, रोहिदास माळी आदि उपस्थित होते.