◽कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीसाना येतायत अडचणी
◻️ उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पोलीस पाटील भरतीच्या आरक्षण सभेचे नोटीस जारी
संगमनेर LlVE | पोलीस यंत्रणेचा अविभाज्य भाग व गावामध्ये शांतता, सुव्यवस्था राखण्याकामी पोलीसांचा दुवा व दूत अशी महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या पोलीस पाटील यांचे संगमनेर तालुक्यातील गावामध्ये सुमारे ७४ पदे रिक्त आहेत. पोलीस पाटील यांची भर्ती प्रक्रिया सातत्याने पुढे ढकलली जात असल्यामुळे या गावात होणारी भांडणे, गावातील माहिती पोलीस व सरकारी कार्यालयात कोणी पुरवायची असा प्रश्न या ७४ गावानमध्ये निर्माण झाला होता. नुकतेचं संगमनेरचे उपविभागीय दंडाधिकारी शैलेश हिंगे यांनी पोलीस पाटील भरतीच्या आरक्षण सभेचे जाहिर प्रकटन काढल्यामुळे पोलीस पाटील भर्ती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात सरपंच व पोलीस पाटील ही गावातील महत्वाची पदे असल्याने त्याच्यां कामाच्या कक्षा दिवसे-दिवस रुंदावत चालल्या आहेत. पोलीस पाटील पद अनेक अर्थाने महत्वाचे आहे. तर सरपंचपद हे बदलणारे असल्याने तो एक राजकीय प्रक्रियेचा व घडामोडीचा भाग असतो. राजकीय घडामोडीपासून अलिप्त व सुरक्षित आणि कायमस्वरुपी असणारे पोलिस पाटील हे पद आहे. संगमनेर तालुक्यातील पोलिस पाटील पदे भरली जात नाहीत, ही शासकीय उदासिनतेची उदाहरणे असल्याचे बोलले जाते. वास्तविक संगमनेर प्रांताधिकार्यांच्या अधिकारात ही पदे भरली जाऊ शकता, परंतु ते ही पदे का भरत नाहीत हा मोठा प्रश्न नेहमी विचारला जात असल्याने अखेर या भर्ती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
संगमनेर तालुका प्रशासनासाठी पोलीस पाटील पदे रिक्त असणे शोभादायक नाही. पोलीस पाटील ग्रामव्यवस्थेचा महत्वाचा भाग म्हणून उपयोगी नाही, तर तो आपल्या कृतीने जिल्हा प्रशासनाने दाखवून देने गरजेचे आहे. तालुक्यातील गावांमध्ये पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनमधील दुवा म्हणून काम पाहणारे पोलीस पाटलांची सुमारे ७४ पदे अनेक वर्षापासून रिक्त असल्याने या गावातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती त्वरीत पोलिसांना मिळत नाही.
ज्या गावाना पोलीस पाटील नाही अशा ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यातील तपासात स्थानिक पातळीवर पोलीसांना अनेक मर्यादा येत असतात. गावांमध्ये पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन त्वरीत पोहचू शकत नाही. त्यामुळे जुन्या काळापासून पोलीस पाटील नेमणुकीची पद्धत आहे. गावांत काय तंटे आहेत, अवैध व्यवसाय, इतर कायदा-सुव्यवस्थेची माहिती गावातील पोलीस पाटलांना असते.
गावांवरील सर्व घडामोडींवर पोलीस पाटलांचे लक्ष असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास लगेच पोलीस यंत्रणेला माहिती मिळते. त्यामुळे पोलीसांना कारवाई करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणता येते. पोलीस पाटील नसलेल्या गावांमध्ये दुसऱ्या गावातील पोलीस पाटील लक्ष ठेवत असले तरी त्याला मर्यादा येतात. त्यामुळे या गावांमध्ये पोलीस पाटील नसल्याने काय चालते, याची माहिती पोलीसांना मिळत नाहीत. पोलीस दररोज येऊन प्रत्येक गावाची पाहणी करून शकत नाहीत. त्यामुळे या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत काय परिस्थिती आहे. तीही पोलिसांना समजत नाही.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या कामकाजात पोलीस पाटील महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने तंटे मिटवण्यात अनेक अडचणी येत आहेत. गावात पोलीस पाटील हे पद रिक्त आहे, त्या त्या ठिकाणी अंमलबजावणीत संथपणा असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. तंटामुक्तीसाठी पात्र ठरण्याकरिता समिती व पोलीस प्रशासनाकडून प्रभावीपणे प्रयत्न केले जात असले तरी त्यात रिक्त पदांमुळे अडथळा निर्माण होत आहे.
प्रत्येक गावास तंटामुक्त गाव समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीमार्फत गावातील अस्तित्वातील तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे सामोपचाराने मिटविण्याची जबाबदारी असते. याशिवाय सार्वजनिक सण शांततेने साजरा करणे, जातीय व धार्मिक सलोखा राखणे, ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यरत करणे, अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे, सामाजिक सुरक्षितता या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आखणीत तंटामुक्त गाव समितीची भूमिका महत्त्वपूर्ण असते.
त्या तंटामुक्त गाव समितीचे निमंत्रक म्हणून पोलीस पाटील काम पाहतात. त्यामुळे पोलिस पाटील हे पद रिक्त असलेल्या गावाना व पोलिस प्रशासनाला अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने संगमनेर तालुक्यातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
मानधनतत्वावरील पोलीस पाटील या पदाची जबाबदारी २४ तासांची असून महसूल आणि गृहखाते यामध्ये या पदाचा समावेश आहे. परंतु महागाईच्या काळात शासनाला पोलीस पाटील यांच्या मानधन भरघोस वाढीबाबत विचार करणे गरजे असून यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण देखील सुरु आहे. आरक्षण सोडत काढण्याची ही तिसरी वेळ असल्याने किमान आतातरी रिक्त जागांवर पोलीस पाटील यांची भर्ती करुन दिलासा देणे गरजेचे असल्याचे संगमनेर पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोकराव थेटे यांनी म्हटले आहे.
संगमनेरचे उपविभागीय दंडाधिकारी शैलेश हिंगे यांनी नुकतेचं तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरीता शासन तरतुदीनुसार गुरुवार दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता प्रांतकार्यालयात आरक्षण सोडत सभेचे आयोजन केले आहे.
संगमनेर तालुक्यातील पोलिस पाटील रिक्त असलेली गावे..
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, वेल्हाळे, कासार दुमला, जवळे कडलग, रहिमपूर, मनोली, ओझर खुर्द, कोचीं, मांची, माळेगांव पठार, कौठे खुर्द, म्हसवंडी, कौठे बुद्रक, वनकुटे, येलखोपवाडी, कोळवाडे, रायते, कोल्हेवाडी, निबांळे, अंभोरे, डिग्रस, शिरापूर, सावरचोळ, सांगवी, कौठे धांदरफळ, मिर्झापूर, पिंपळगाव कोंझिरा, कुरण, माळेगांव हवेली, निळवंडे, तिगाव, मेंढवन, कौठे कळमेश्वर, वाबळेवाडी, सारोळे पठार, सावरगांव घुले, गाभणवाडी, झोळे, शिबलापूर, पानोडी,
पिप्रीं - लौकी अजमपूर, दाढ खुर्द, आश्वी खुर्द, पिंपळे, नान्नज दुमाला, लोहारे, मिरपूर, निमोण, पळसखेडे, सोनेवाडी, कऱ्हे, मांडवे बुद्रक, बिरेवाडी, शिंदोडी, दरेवाडी, कौठे मलकापूर, शेंडेवाडी, खांबे, खरशिदें, पिंपळगाव देपा, कोकणगाव, शिवापूर, चिंचोली गुरंव, खराडी, बोरबनवाडी, उंबरी, वडगावपान, निमगावजाळी, सुकेवाडी, भोजदरी, पोखरी बाळेश्वर, वरंवडी, जवळे बाळेश्वर व हिवरगावपावसा या गावातील पोलीस पाटील पद रिक्त आहे.