लोणी पोलीसांकडून बनावट लग्न लावून देणारी टोळी जेरबंद
◻️ लग्न लावण्यासाठी ३ लाख २० हजार रुपये लाटले
◻️ मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने मध्यस्थीने उकळले २६ हजार रुपये
संगमनेर LIVE | दिवसेंदिवस मुलींचा जन्मदर घटत असल्यामुळे गावोगावी अनेक मुले लग्नाविना राहत आहेत. आपली लग्ने आता होणार का, या चिंतेत मुलांसह त्यांचे पालकही चिंतेत आहेत. याचाच फायदा घेत, फसवून लग्न लावण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाचं एका टोळीचा लोणी पोलीसांनी भांडाफोड करत या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की भगवतीपुर (ता. राहता) येथील एका मुलाला लग्न करण्यासाठी मुलगी दाखवितो असे म्हणुन मध्यस्थ आरोपी पुंडलीक चांगदेव शिंदे उर्फ सतिश बाबासाहेब शिंदे यांने आरोपी दिपीका प्रविण कांबळे हीचे लग्न झालेले असतांना ती नवरी आहे असे भासवुन नवरदेवाच्या कुटुंबाकडून लग्न लावण्यासाठी रुपये ३ लाख २० हजार रुपये घेतले व फिर्यादीचे सदर गुन्ह्यांतील फिर्यादी यांचे मुलांशी लग्न लावुन देवुन त्यांची फसवणुक केली आहे.
त्यामुळे लोणी पोलीस स्टेशन येथे ७७६/२०२३ भा.द. वि. कलम ४२०, ४१८, ४०६, ४१७,१२० (ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सपोनि युवराज आठरे, पोसई योगेश शिंदे, पोसई आशिष चैधरी, पोहेका दिनकर चव्हाण, पोना रविंद मेढे, पोना गणेश आंडागळे, पो.कॉ. मच्छिद्र इंगळे, मपोका जयश्री सातपुते, मपोका मनिषा गिरी यांचे पथक नेमण्यात आले होते.
या गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता आरोपी पुडलीक चांगदेव शिंदे उर्फ सतिश बाबासाहेब शिंदे यांनी लग्न लावण्यासाठी मध्यस्थ केली होती त्या बदल्यात एकुण २६ हजार रुपये घेतले ते जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील आरोपी रेश्मा उर्फ दिव्या रमेश चव्हाण, रोहिणी कैलास गायकवाड, दिपीका प्रविण कांबळे (सर्व रा. बदलापुर बेलवली ता. अमरनाथ जि. ठाणे), पुंडलिक चांगदेव शिंदे उर्फ सतिष बाबासाहेब शिंदे (रा. तिळवणी ता. कोपरगाव) यांना जेरबंद केले आहे. त्यांना ३० डिसेंबर पर्यत पोलीस कोठडी मिळाली आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांचे सुचना व मार्गदर्शना खाली लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोसई योगेश शिंदे, पोसई आशिष चैधरी, पोहेका दिनकर चव्हाण, पोना रविंद मेढे,, पो.कॉ. मच्छिद्र इंगळे गणेश आंडागळे, मपोका जयश्री सातपुते, मपोका मनिषा गिरी या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.