पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील याना पुण्यतिथी दिनी संगमनेर येथे अभिवादन
◻️लोकनेते पद्मभूषण डॉ. विखे पाटील यांच्या आठवणींना उजाळा
संगमनेर LIVE | शेती, सहकार, शिक्षण, आरोग्य, पाणी आणि ग्रामीण विकासाचे शिल्पकार लोकनेते पद्मभूषण उपाधीने सन्मानित डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची ७ वी पुण्यतिथी संगमनेर येथील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली.
त्यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते अँड बापूसाहेब गुळवे, वसंतराव गुंजाळ, इंजि. हरिशचंद्र चकोर, राम जाजू, डॉ. सोमनाथ कानवडे, राजेंद्र सांगळे, सुधाकर गुंजाळ, अमोल खताळ, जावेदभाई जहागीरदार, शंकर वाळे, अॅड. संदीप जगनर, दीपक भगत, सीताराम मोहरीकर, संपत गलांडे, डॉ. अरुण इथापे, अॅड. अशोक जोंधळे, कैलास भरीतकर, कैलास गोडसे, श्रीनाथ थोरात, सुमित काशीद, रऊफ शेख, महेश मांडेकर, संदेश देशमुख, घनश्याम भोसले, संतोष पठाडे, समीर मोरे, कार्यालयीन प्रमुख सुजीत क्षीरसागर यांसह भगवान शिंदे, एकनाथ आल्हाट उपस्थित होते.
यावेळी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणींना वसंतराव गुंजाळ, अॅड. बापूसाहेब गुळवे, अमोल खताळ, डॉ. सोमनाथ कानवडे, इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी उजाळा दिला आला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.