उंबरी - शेडगाव पुलाचे काम प्रगतीपथावर
◻️ उंबरीसह पंचक्रोशीतील सुमारे १५ गावासह वाड्या वस्त्याना होणार फायदा
◻️ पावसाळ्यापूर्वी पुल सर्वसामान्य नागरीकांनसाठी खुला होण्याची शक्यता
संगमनेर LIVE | उंबरीसह पंचक्रोशीतील गावे विकासकामध्ये प्रगतीपथावर यावीत व या गावाचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा सोडवला जावा यासाठी २०२१ साली भाजपचे जेष्ठ नेते विद्यमान महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उंबरी व शेडगाव ही दोन्ही गावे वसलेल्या प्रवरा नदीवर ६ कोटी ५० लाख रुपये खर्चून मोठा पूल बांधण्यासाठी निधी मंजूर केला व त्यांचे औपचारिक भुमीपूजन देखील केले होते. मध्यंतरी काही कालावधीसाठी पुलाचे काम बंद असले तरी आता ते काम प्रगतीपथावर असून पावसाळ्या पुर्वी हा पूल नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पुलामुळे उंबरी व परिसरातील गावांमध्ये विकासकामे करताना मोठी गती मिळणार असून विकास प्रक्रिया व पायाभूत सुविधा राबविताना या पुलामुळे मदत मिळणार आहे. तर दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे रस्ते विकासाला गती मिळणार आहे. यामुळे सर्व सामान्य नागरीकांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत मिळणार आहे. मध्यंतरीच्या काळात नदीला पाणी असल्यामुळे व इतर तांत्रिक कारणामुळे पुलाचे काम बंद होते. त्यामुळे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुलाचे काम प्रगतीपथावर नेण्याच्या सुचना दिल्यानंतर पुलाच्या कामाला गती मिळाली आहे.
उंबरी - शेडगाव पुलाची कामासाठी कुशल व अकुशल असे ३० ते ३५ कामगार काम करत असून नदी पात्रात पाणी असल्यामुळे कॉलम भरण्यासाठी अडचणी येत असल्यातरी भराव टाकून पाण्याचा प्रवाह एका बाजूने तात्पुरता वळून राहिलेले कॉलम ओतले जाणार आहे. लवकरात लवकर या पुलाचे काम पुर्ण करुन पुल नागरिकांसाठी खुला होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान उंबरी - शेडगाव पुल खुला झाल्यानंतर शेडगाव पंचक्रोशीतील नागरीकाना फायदा होणार असला तरी आश्वी खुर्द येथील बाजारपेठेला मात्र यांचा मोठा अर्थिक फटका बसण्याची शक्यता असून येथील शैक्षणिक संस्थांमध्ये ही विद्यार्थ्यांची संख्या घटण्याची भिंती व्यक्त केली जात आहे.
या गावांना होणार पुलाचा लाभ..
प्रवरा नदीपात्रात उभारण्यात येत असलेल्या या मोठ्या पुलाचा फायदा उंबरी बाळापूर, शेडगाव, अंभोरे, मालुंजे, पानोडी, शिबलापूर, माळेवाडी, पिपंरणे, कनोली, कनकापूर, ओझर बुद्रक, ओझर खुर्द आदि गावांना होणार आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शेडगाव - आश्वी खुर्द रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. स्थानिक शेतकरी हा रस्ता निर्माण करण्यात अडचणी आणत असल्याने ग्रामस्थासह शालेय विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र उंबरी - शेडगाव पुल झाल्यानतंर विद्यार्थ्यी, जेष्ठ नागरीक व ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याने आनंदाचे वातावरण असल्याच्या भावना शेगावचे माजी उपसरपंचदिलीप श्रीहरी नांगरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
याआधी आश्वी, कळस, दाढ, जोर्वे आदि ठिकाणी पुलाची कामे मजबूत व वेळेत पुर्ण केली असून निसर्गाने साथ दिली तर उंबरी - शेडगाव पुलाचे काम देखील वेळेत पुर्ण करुन पावसाळ्यापूर्वी म्हणजे में महिन्यात नागरिकांसाठी हा पुल खुला करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती पुल बांधकामांचे ठेकेदार के .के. थोरात यांनी दिली.