सावता महाराज सेवाभावी संस्थेस युनिक्लिजर कंपनी व नेत्रवाला ग्रुपने दिली भेट
◻️ गेली २२ वर्षे शैक्षणिक संस्था अव्याहतपणे विनाअनुदानित तत्वावर सुरू
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील सावता महाराज सेवा भावी संस्था, अहिल्यादेवी होळकर विद्यालय खंदरमाळवाडी व खंडेराय विद्यालय खंडेरायवाडी येथे नुकतीचं युनिक्लिजर कंपनी व नेत्रवाला ग्रुपच्या संचालक मंडळाने भेट दिली आहे.
खंदरमाळवाडी येथे या विद्यालयाचे सर्व विद्यार्थी गावातील मंदिर तसेच सोसायटीचे गोडाऊन मध्ये बसत आहेत. गेली २२ वर्षे संस्था विनाअनुदानित तत्वावर चालवत आहे. शासन दरबारी पाठपुरावा चालू आहे. मात्र शासन खासगी शाळांना मान्यता व अनुदान देत नाही. त्यामुळे युनिक्लिजर कंपनीने व नेत्रावाला ग्रुपच्या सर्व संचालकासह संस्थचे प्रमुख किशार डोमे यांनी संस्थेला मदतीचे आवाहन केले आहे.
दरम्यान युनिक्लिजर कंपनी व नेत्रवाला ग्रुपने नेहमी सावता महाराज संस्थेस मदत केली असल्याने त्याचे संस्थेने आभार मानले आहेत.