पिप्रीं येथिल शिक्षक भाऊसाहेब दातीर यांचे ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन
◻️मागील वीस वर्षापासून करत होते ज्ञानदानाचे कार्य
◻️पिप्रीं - लौकी अजमपूर सह पंचक्रोशीत शोककळा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील व पिप्रीं - लौकी अजमपूर येथिल शिक्षक भाऊसाहेब कारभारी दातीर (वय - ४९) यांचे निधन सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले असून आज मंगळवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
दिवंगत भाऊसाहेब दातीर हे पुणे जिल्ह्यातील सांगवी येथील नगरपालिकेच्या शाळेमध्ये गेली वीस वर्षापासून शिक्षक होते. त्याचे प्राथमिक शिक्षण संगमनेर तालुक्यातील पिंप्री - लौकी अजमपुर, माध्यमिक शिक्षण आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन येथे १९८६ ते ९० च्या काळामध्ये जवळपास बारा किलोमीटर पायी प्रवास करून शिक्षण पुर्ण केले. बारावीला ८५ टक्के मार्क मिळवून डीएड पूर्ण करत २००१ मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले होते. त्याची पत्नी देखिल शिक्षका असल्याने त्याचा संसार सुखाचा सुरु होता. त्यानी वीस वर्षे मुलांना घडवण्याचे काम केले होते.
सोमवारी अचानक भाऊसाहेब दातीर यांच्या पोटात दुखायला लागले व त्याना उलट्या आणि जुलाब सुरु झाले होते. यानंतर त्याचा बीपी कमी झाला आणि त्यातच हृदयविकाराचा तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. मंगळवारी सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून याप्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
दरम्यान दिवंगत भाऊसाहेब दातीर यांच्या पश्चात आई ताराबाई कारभारी दातीर, भाऊ रावसाहेब दातीर, पत्नी पूनम दातीर, एक मुलगी व एक मुलगा असा मोठा परिवार आहे.