महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर १०० कोटी रुपयेची पुस्तक विक्री!

संगमनेर Live
0
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर १०० कोटी रुपयेची पुस्तक विक्री!

◻️ चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि राजगृह येथे पुस्तक खरेदीला जोरदार प्रतिसाद
◻️
संगमनेर LIVE | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमधील चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि राजगृह येथे मांडलेल्या पुस्तकांच्या विविध स्टॉल्सवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या तसेच अन्य लेखकांच्या विविध पुस्तकांच्या विक्रीला यंदा जोरदार प्रतिसाद मिळाला. 

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयातर्फे पुस्तके ही अर्ध्या किमतीत विकण्यात आल्यामुळे वाचकांनी एकच गर्दी केली होती. अन्य वर्षांच्या तुलनेत यंदा पुस्तक विक्रीचा मोठा व्यवसाय झाला आहे. एकूण १०० कोटींचा व्यवसाय झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दादर स्थानकापासून रस्त्यांच्या दुतर्फा पुस्तक विक्रीचे लहान- मोठे स्टॉल्स मांडण्यात आले होते. नाममात्र दरात या पुस्तकांची विक्री होत असल्याने बहुतांश नागरिकांनी पुस्तकखरेदीला पसंती दिली. मैदानाच्या प्रवेशद्वारावर एलइडी स्क्रीन उभारून चित्रफितीच्या माध्यमातून पुस्तकांची माहिती देण्यात येत होती.

त्याशिवाय दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे, मूर्ती, निळ्या रंगाचे फेटे यांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. सोबतीला गौतम बुद्ध यांच्या विविध मूर्ती, नेकलेस यांचेही स्टॉल्स होते. असे वृत्त दै. लोकसत्ताने दिले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !