ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा खूप झाली, आता प्रत्यक्ष कृतीची गरज - सतीश खाडे
◻️ पद्मश्री डाॅ. विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प
◻️ महाराष्ट्रात ४३ टक्के धरणे असतांनाही ५२ टक्के क्षेत्राला पाण्याची टंचाई
संगमनेर LIVE (लोणी) | हवामान बद्दल, वाढते तापमान, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी यांचा सर्वानीच गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सर्वत्र ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा सुरू असते. परंतू चर्चा करण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा लागेल. पाण्यासाठी ट्रेडींग सुरु झाले असून येणाऱ्या काळात पाण्याची बचत केली नाही तर खुप मोठ्या संकटाचा सामना करा लागले असे मत पुणे येथील उद्योजक आणि प्रवरेचे माजी विद्यार्थी सतीश खाडे यांनी व्यक्त केले.
लोणीच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात २३ व्या पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेचे पहीले दुसरे पुष्प गुंफताना सतीश खाडे यांनी ‘सगळे जग टायटॅनिकचे प्रवासी’ या विषयावर अभ्यसपूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील होत्या. विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, विखे पाटील कारखान्याचे संचहलक संचालक संजय आहेर, विखे पाटील कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्राचार्य डॉ. आर. पवार, प्रा. धनजय आहेर यांच्यासह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि जेष्ठ नागरीक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सतीष खाडे म्हणाले, महाराष्ट्रात ४३ टक्के धरणे असतांनाही ५२ टक्के क्षेत्राला पाण्याची टंचाई आहे. निसर्गाचा विचार कुणी करत नाही. पर्यावरणाबाबत जी जागृती होण्याची गरज आहे ती होत नसल्याची खंत व्यक्त करत पाण्यासाठी युद्ध सुरू झाले असून यामध्ये १/३ लोकांचा सहभाग आहे, ग्लोबल वार्मिंगचे संकट हे मानव निर्मीत आहे. पर्यावरण, पाणी, हवा, यांचा विचार होत नाही. आज केवळ १५ टक्के लोकांनाच स्वच्छ पाणी मिळते. ग्लोबल वार्मिगच्या संकटाबाबत प्रबोधन करतांनाच यावर मात करण्यासाठी आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापराबरोबरच पाणी बचतीसाठी, हवा स्वच्छ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
समस्या आणि संकटातही संधी आहे. तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचे सूचित करून टायटॅनिकचे प्रवासी व्हायचे नसेल असे वाटत असेल तर प्रत्येकाने शिस्त उपाय-योजना करत पाणी बचत, स्वच्छ हवा, प्लॉस्टिकचा कमी वापर यांची सुरुवात आपल्यापासून करावा असे आवाहनही केले.
प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी प्रास्ताविकातून श्री खाडे यांचा परिचय करुन दिला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी केले. आभार प्राचार्य डाॅ. संजय भवर यांनी मानले.
दरम्यान गुरुवारी ४ थे पुष्प प्रसिध्द कथा-कथनकार डाॅ. संजय कळमकर हे स्वामी विवेकानंद आणि आपण याविषयांवर गुंफणार आहे.