चैतन्य गगनगिरी महाराज करंडक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

संगमनेर Live
0
चैतन्य गगनगिरी महाराज करंडक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न 

◻️ पिपंरणे येथे विद्यार्थ्याच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर स्पर्धा यशस्वी

◻️ विविध ८६ विद्यालयातील १६५ स्पर्धक सहभागी 


संगमनेर LIVE | परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय पिंपरणे व संगमनेर साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे हे तेरावे वर्ष आहे.

स्पर्धांचे उद्घाटन संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर, स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष विलास साळवे, माजी गटशिक्षणाधिकारी सुभाष पवार, साहित्य परिषदेच्या सदस्य शोभाताई बाप्ते, प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे, दीपक क्षत्रिय, ज्ञानेश्वर राक्षे, निलेश पर्वत, संतोष पवार, नंदकुमार बेल्हेकर, डॉ. मोटेगावकर, सुरेश म्हाळस, विजय दीक्षित, मुकुंद डांगे, गिरीश सोमानी, सुभाष औटी प्राचार्य डी. आर. सोनवणे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन उपस्थित होते. याप्रसंगी प्रतिमा पूजन करण्यात आले.

संगमनेर साहित्य परिषदेच्या सदस्यांनी स्पर्धांचे परीक्षण केले. परिषदेचे सदस्य बाळकृष्ण महाजन यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून परिषदे मार्फत काम पाहिले. या स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आल्या. इयत्ता तिसरी चौथी, इयत्ता पाचवी ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी व इयत्ता अकरावी बारावी असे हे गट होते. शेवगाव, पारनेर, श्रीरामपूर, राहुरी, अकोले, कोपरगाव, नाशिक सह संगमनेर तालुक्यातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. सर्व गट मिळून एकूण ८६ विविध विद्यालय संस्थांमधील १६५ स्पर्धक विद्यार्थ्यानी आपली भाषणे या स्पर्धेत सादर केली.

आत्मविश्वासाने, ओघवत्या शैलीमध्ये विद्यार्थ्यांनी भाषणे केली. भाषणातील माहितीपूर्ण आशयाने, मुद्देसूद मांडणी, स्पष्ट शुद्ध शब्दोचाराने उपस्थित श्रोत्यांची मने या विद्यार्थ्यांनी जिंकली. परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी स्पर्धा संयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्पर्धेबरोबरच आलेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मिष्टान्न भोजनाची सोयही करण्यात आली होती. 

संगमनेर साहित्य परिषदेच्या सदस्यांचे चांगले सहकार्य लाभले. विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी यासाठी भरीव आर्थिक योगदान दिले. तसेच यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था व शोभा बाप्ते मॅडम यांचेही योगदान लाभले
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख सर्व पदाधिकारी व स्कूल कमिटी सदस्यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान शनिवार दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !