खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नांना यश!

संगमनेर Live
0
खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नांना यश!

◻️ वांबोरी चारीचे २५ लाखांचे थकीत लाईट बिल एमएसईबीच्या खात्यात वर्ग

◻️ सरकारकडून १ कोटी ९ लाख ७५ हजार ९४५ रूपये 
 सबसिडी

संगमनेर LIVE | वांबोरी चारीतील २५ लाखांचे लाईट बिल थकीत होते. हे लाईट बिल खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नांमुळे एमएसईबीच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे.

वांबोरी चारीचे जर ३ पंप चालू असले तर सुमारे १ कोटीच्या आसपास महिन्याचे लाईट बिल येत असते. त्यामुळे लाईट बिल थकल्याचे समोर आले. दरम्यान उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय २२ ऑगस्ट २०२३ नुसार अतिउच्च दाब, उच्च दाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनेंतर्गत ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यास शासनाने मुदतवाढ दिल्याने वांबोरी चारीचे २ महिन्याच्या लाईट बिलामध्ये एकूण १ कोटी ९ लाख ७५ हजार ९४५ रुपये इतकी सबसिडी शासनाने दिलेली आहे. या सबसिडीमुळे नोव्हेंबर महिन्याचे करंट बिल ११,०३,७७४.४० रुपये व डिसेंबर महिन्याचे करंट बिल २३,९४,१८० रुपये इतके कमी प्रमाणात आलेले आहे. 

तसेच कार्यकारी संचालक, गोदावरी विकास महामंडळ यांच्या कार्यालयाकडे योग्य तो पाठपुरावा केल्याने वांबोरी चारीचे चालू विद्युत देयक भरण्यासाठी २५ लक्ष इतकी रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे वांबोरी चारीचे महावितरणकडून तोडण्यात आलेले वीज कनेक्शन जोडण्यात आले असून आता वांबोरी चारी पुन्हा चालू होत आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !