दुर्गापूर सेवा संस्थेच्या चेअरमन पदी पुलाटे आणि व्हा. चेरअरमन पदी मनकर
संगमनेर LIVE (लोणी) | दुर्गापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी कचरू बाबुराव पुलाटे आणि व्हा. चेअरमन पदी धोंडिबा मनकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी जनसेवा युवा परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष आणि सरपंच नानासाहेब आण्णासाहेब पुलाटे, आ. विखे पाटील ट्रक वाहतूक संस्थेचे व्हा चेअरमन सुनील जाधव, उप सरपंच नबाजी रोकडे, माजी चेअरमन बाबासाहेब पुलाटे, सोपानराव पुलाटे, वेणूनाथ पुलाटे, लक्ष्मण पुलाटे आदीसह सर्व संचालक उपस्थित होते.
दरम्यान नुतन पदाधिकाऱ्यांचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.