संगमनेर तालुक्यातील १२८ लाभार्थ्याना ९ लाख ८३ हजार रुपयांचे साहित्य
◻️ नामदार विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झाल्याची अमोल खताळ यांची माहिती
संगमनेर LIVE | समाजकल्याण विभाग माध्यमातून सुरु असलेल्या कडबा कुट्टी, पीठ गिरणी,लेडीज सायकल या योजनांपोटी संगमनेर तालुक्यातील १२८ लाभार्थ्यांना ९ लाख ८३ हजार रुपयांचे साहित्य महसूल तथा पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मंजुर झाले अशी माहिती संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली.
सरकारच्या वतीने विविध योजना राबविल्या जात असतात त्यासाठी ग्रामीण भागातील गरुजुवंत यांना त्या योजनेचा लाभ व्हावा यासाठी नामदार विखे पाटीलांच्या माध्यमातून संगमनेर मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने काम सुरु आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यकाल संपलेला असल्यामुळे समाजकल्याण विभागाच्या वतीने सुरु असलेल्या योजनेचा लाभ मिळतो का नाही अशी शंका काहींनी व्यक्त केली होती.
भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ग्रामीण भागात गावागावात या योजनेसाठी पात्र असलेल्यांशी संपर्क साधून प्रकरणे समाज कल्याण विभागात जमा करून लाभार्थी यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. संगमनेर तालुक्यात विखे पाटीलांच्या माध्यमातून करोडो रुपये निधी विविध विकास कामांसाठी मिळत आहे त्यामाध्यमातून अनेक वर्ष प्रलंबित असलेले अनेक विषय मार्गी लागत असल्याचे समाधान नागरिक व्यक्त करत आहे.
नामदार विखे पाटील यांच्या सूचनेनुसार नुकतेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर यांनी संगमनेर तालुक्यासाठी १८ कडबा कुट्टीसाठी ४ लाख ६८ हजार रुपये, १८ पीठ गिरणीसाठी २३ हजार ४०० रुपये, शालेय मुलींसाठी ८२ लेडीज सायकलसाठी ४ लाख ९२ हजार रुपये मंजूर केले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोक हितकारी योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन अमोल खताळ पाटील यांनी केले.