ऑलिम्पिक दर्जाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा - अनिल नागणे
◻️ एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळाल्याबद्दल सौ. प्रीती जाधव यांचा भव्य सत्कार
संगमनेर LIVE | दरवर्षी राज्यात अंदाजे १० लाख विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसत असतात. शिक्षणातून मिळालेल्या संधीचे सौ. प्रीती जाधव यांनी सोनं करत कठोर परिश्रमाच्या बळावर एमपीएससी परीक्षेत प्रचंड मोठे यश संपादन केले आहे. ऑलिम्पिक दर्जाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन सौ. प्रीती साईनाथ जाधव यांनी आश्वी खुर्द येथून प्रशासकीय सेवेत जाण्याचा पहिला मान मिळवला असल्याचे गौरवोद्गार गट विकास अधिकारी अनिल नागणे यांनी काढले आहेत. सौ. प्रीती यांची प्रेरणा घेऊन गावातील मुला-मुलीनी प्रशासकीय सेवेत जावे असे आवाहन देखील यावेळी केले.
एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळाल्याबद्दल सौ. प्रीती साईनाथ जाधव यांचा आश्वी (ता. संगमनेर) येथे आयोजित सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना संगमनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महंत दत्तगिरी महाराज, विस्तार अधिकारी आर. आर. ठाकूर, सुदाम वाजे, सौ. संजीवणी वाजे, अशोक वाजे, सुंदर वाजे, भाऊ माळी, सुरेश मोरे, दत्तात्रय तोरडे, विखे कारखान्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, प्रवरा बॅकेचे संचालक बापूसाहेब गायकवाड, मा. संचालक अॅड. अनिल भोसले, दूध संस्थेचे चेअरमन मकरंद गुणे, वैशाली तांबे, आशाताई मुन्तोडे, सुनीताताई मोरे ग्रामसेवक प्रवीण इल्हे, उपसरपंच बाबासाहेब भवर, माजी उपसरपंच संजय गायकवाड, संजय भोसले, सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड, संतोष भडकवाड, सागर भडकवाड, युन्नुस सय्यद, आदिनाथ जाधव, सोमनाथ जाधव, सौ. जयश्री संजय गायकवाड, सौ. मनिषा आदिनाथ जाधव, माजी प्राचार्य विठ्ठल वर्पे, आश्वी बुद्रुकचे माजी सरपंच हरिभाऊ ताजणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्तगिरी महाराज म्हणाले की, सौ. प्रीती साईनाथ जाधव या गावच्या सुनेने एमपीएससी परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आयोजित करण्यात आलेला हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम कौटुंबिक नव्हे तर, गावचा कार्यक्रम म्हणून लौकिक प्राप्त झाला आहे. गरिबीतून यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीला सर्वसामान्य व्यक्तीच्या कष्टाची जान असते. त्यामुळे सौ. प्रीती जाधव या ज्या प्रशासकीय पदावर काम करतील त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवावा असे शुभाशीर्वाद दिले आहेत.
दरम्यान सौ. प्रीती साईनाथ जाधव याचे माहेर रा. हांडी (ता. मावळ, जि. पुणे) असून सातारा जिल्ह्यात लोणी तोडंल येथे तलाठी या पदावर कार्यरत आहेत. याचं काळात त्यांनी पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासिकेत अभ्यास करून एमपीएससीच्या यशाला गवसणी घातल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आई - वडील यांनी केलेल्या कष्टाचे चीज करण्यात सासरच्या मंडळी व पती साईनाथ जाधव यांच्या पाठिंब्यामुळे अशक्य गोष्ट शक्य करण्यात यश आले आहे. भविष्यात यावरचं न थांबता केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा देऊन क्लास वन अधिकारी होऊन देशसेवा करण्याचा मानस असल्याच्या भावना सौ. प्रीती साईनाथ जाधव यांनी बोलून दाखवल्या आहेत.