भाजपच्या संगमनेर तालुका उपाध्यक्ष पदी प्रवीण शेपाळ यांची निवड
◻️ विखे पाटील यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तालुकास्तरावर काम करण्याची संधी
संगमनेर LIVE | भारतीय जनता पार्टीचे संगमनेर तालुकाध्यक्ष वैभव लांडगे यांनी नुकतीच तालुक्याची नविन कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये ओझर खुर्द (ता. संगमनेर) येथील तरूण सामाजिक कार्यकर्ते व विखे पाटील कुटुंबाचे निष्ठावंत प्रवीण उर्फ बबलू बाळासाहेब शेपाळ यांची भाजपच्या संगमनेर तालुका उपाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे. प्रथमचं तालुक्यातील एका युवा कार्यकर्त्याला तालुका स्तरावर काम करण्याची संधी मिळणार असल्याने शेपाळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रवीण उर्फ बबलू शेपाळ हे मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. ओझरसह पंचक्रोशीतील गावांमध्ये त्याचां मोठा जनसंपर्क आहे. विखे पाटील कुटुंबाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते प्रसिद्ध असून हातात घेतलेले काम तडीस नेण्यासाठी देखील ते ओळखले जातात.
निवडीबाबत प्रतिक्रिया देताना प्रवीण शेपाळ म्हणाले की, भविष्य काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे घ्येय धोरणे, केंद्राच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवून संगमनेर तालुका भाजपमय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना व्यक्त केली आहे.
दरम्यान खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, सौ. धनश्रीताई विखे पाटील, बाळासाहेब भागवत, संपत शिंदे, शिवाजी शेजुळ, बाळासाहेब शिंदे, रामनाथ शिंदे तसेच तालुका जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यानी या निवडीबद्दल प्रवीण शेपाळ यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.