१ कोटी ६० लाख २१ हजार रुपये लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग - अमोल खताळ पाटील

संगमनेर Live
0
१ कोटी ६० लाख २१ हजार रुपये लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग - अमोल खताळ पाटील

◻️ संजय गांधी निराधार योजनेतील जानेवारी २०२४ अखेरपर्यतचा निधी वर्ग 

संगमनेर LIVE | राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून सुरु असलेल्‍या संजय गांधी निराधार योजना अंतर्गत तालुक्‍यातील लाभार्थ्‍यांना जानेवारी २०२४ अखेर १ कोटी ६० लाख २१ हजार २०० रुपये महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या विशेष प्रयत्‍नांमुळे लाभार्थी खात्‍यात वर्ग झाला असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली.

सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय दिव्‍यांग निवृत्‍ती वेतन योजना, राष्‍ट्रीय कुटूंबलाभ योजना अशा योजनांचा यामध्‍ये समावेश आहे.

माहे जानेवारी २०२४ चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती ५६१ लाभार्थ्याना ८ लाख ३४ हजार  रुपये, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती २२८ लाभार्थ्यांना ३ लाख ३९ हजार  रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण ५३६७ लाभार्थ्यांना ८० लाख ५० हजार ५००  रुपये, श्रावणबाळ गट ब  सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जाती ७०१ लाभार्थ्यांना  १० लाख ५१ हजार ५०० रुपये, श्रावणबाळ गट ब  सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती ३२५ लाभार्थ्यांना ४ लाख ८७ हजार ५०० रुपये व श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ४०७१ लाभार्थ्यांना  ५२ लाख ५८ हजार ७०० रुपये मात्र अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खातेवर वर्ग करणेत आले आहे.

संगमनेर तालुक्यात काही लोक कागदपत्रे जमा करून प्रकरण करण्यासाठी पैसे घेत आहेत अश्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहे. त्यांना यामाध्यामातून मी सांगू इच्छितो की प्रकरणे नियमानुसारच मंजूर होणार असल्यामुळे फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच लाभार्थी म्हणून मानधन मिळण्यास काही अडचण येत असल्यास माझ्याशी, नामदार विखे पाटील जनसंपर्क कार्यालय अथवा भाजप कार्यालय, संगमनेर येथे संपर्क साधावा असे आव्हान अमोल खताळ पाटील यांनी केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !