राज्य सरकारकडून मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय - सौ. विखे पाटील
◻️ लोणी येथे “उडान २०२३” निमित्त पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन
संगमनेर LIVE | राज्य सरकारने मुलींना मोफत शिक्षण देण्याचा घेतलेला निर्णय हा महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी आपल्या विचाराची क्षमता वाढवावी आपले ध्येय मोठे ठेवा. शिक्षणातून पुढे जातांना स्वयंपूर्ण व्हा. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनी ताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेले पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी आणि इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, लोणी यांच्या वतीने आयोजित उडान २०२३ निमित्त आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमात सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी माजी विद्यार्थी भिमराज रोहकले, निलेश सुसे, संस्थेचे संचालक गणपत शिंदे, सौ. अलका दिघे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद डॉ. बी.एम पाटील, प्राचार्य डॉ. रविंद्र जाधव, डाॅ.संजय भवर, आदीसह विद्यार्थी पालक उपस्थित होते.
सौ. विखे पाटील पुढे म्हणाल्या, पद्मश्रीनी ग्रामीण भागात सुरु केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी जगाच्या पाठीवर आहेत. शिक्षणातून पुढे जातांना मुलीनी स्वयंपूर्ण व्हावे यासाठी राज्य सरकारने मुलींना मोफत शिक्षणाची केलेली घोषणा महत्वपूर्ण ठरणार आहे. जीवन मोठं होताना आपली गुणवत्ता जपा असे सांगितले.
माजी विद्यार्थी भिमराज रोहकले यांनी औषध निर्माण क्षेत्रात मोठी करीअर संघी असली तरी यामध्ये स्पर्धा वाढत आहे प्रवरेतून आपण शिक्षणासोबतचं संस्कारही शिकत असल्यामुळे आपण आरोग्यक्षेत्रासाठी योगदान द्यावे असे सांगितले. यावेळी निलेश सुसे, डाॅ. बी. एम. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमान्या प्रारंभी डॉ शिवानंद हिरेमठ यांनी फार्मसी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमाची माहीती दिली. डॉ. रविंद्र जाधव यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. समृध्दी पाटील आणि डॉ. विशाल तांबे यांनी तर आभार प्रा. दत्तात्रय थोरात यांनी मानले.