शिव जयंती ही सामाजिक उपक्रमातून साजरी व्हावी - सौ. शालिनीताई विखे पाटील
◻️ छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवकालीन क्रिडा स्पर्धाचे आयोजन
संगमनेर LIVE (लोणी) | प्रवरेच्या माध्यमातून शिक्षणासोबतचं विविध खेळाला महत्व दिले जात असल्याने क्रिडा क्षेत्रातही प्रवरेचे विद्यार्थी आघाडीवर आहेत. शिवजयंती निमित्त होणारे शिवकालीन खेळाच्या स्पर्धा या महत्वपूर्ण असून शिव जयंतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास, त्यांचे विचार समजून घेत शिवजयंती उत्सव हा सामाजीक उपक्रमातून साजरा करा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कुल, लोणी येथे संस्थेअंतर्गत आयोजित शिवकालीन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणात सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी कर्नल शेखर जोशी, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्राचार्य भारत गाढवे, कार्यक्रम समन्वयक रमेश दळे, ज्ञानेश्वर पाठक, संजय तांबे, मयुर कदम, बाबासाहेब बागले आदी उपस्थित होते.
शिवकालीन स्पर्धेमध्ये भाला फेक, कुस्ती, हु तू तू, गलूल या स्पर्धेमध्ये १३ शाळा मधुन १७४ स्पर्धेक सहभागा झाले. यावेळी हु तू तू स्पर्धेत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कुल लोणी, प्रवरा माध्यमिक विद्यालय, झरेकाठी, ज्ञानामृत माध्यामिक विद्यालय रामपूरवाडी, प्रवरा गर्ल्स इंग्लीश मेडीयम स्कुल अँड ज्यु. कॉलेज, लोणी भाला फेकमध्ये अभिजित नवले, अमरनाथ अरोरा, समर्थ नालकर, पायल शिंदे, तनुष्का शिंदे, सानिका पवार, आदित्य पाटील, अनिकेत दाते, देव कुलकर्णी, कुस्तीमध्ये संग्राम पवार, सक्षम सुकाळे, आकाश वडीतके, तर गगलू स्पर्धेमध्ये प्रदिप माळी, साईनाथ माळी, ओमकार मोरे, प्रदिप मोरे, ईश्वरी वडीतके, आर्यन मराठे, साक्षी मोरे,प्रण्यम खुरसाळे, प्रणव पवार, देविता पालवी, भारती महाले यांनी यश संपादन केले.
कर्नल शेखर जोशी यांनी प्रास्ताविकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील विविध खेळाची ओळख व्हावी हा उद्देश यामागील होता. पुढील वर्षी खेळीची आणि स्पर्धेची व्याप्ती वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.