आश्वी बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान व महाप्रसादाचे वाटप
◻️ शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान कडून विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
◻️ बाळासाहेब शिंगोटे यांचे शिव व्याख्यान आणि सुप्रसिद्ध गायक अविनाश कदम यांच्या शिवगितांच्या कार्यक्रमाची मेजवानी
संगमनेर LIVE (आश्वी) | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथील शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान कडून विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन बाजारतळानजीक असलेल्या नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले आहे.
यावेळी सकाळी ९ वा. शिवज्योत आगमन झाल्यानंतर शिवज्योतची सवाद्य भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. यानंतर प्रतिमापूजन व महाआरती केली जाणार आहे. सकाळी १० वा. बाळासाहेब शिंगोटे (पारनेर) यांचे शिव व्याख्यान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे देखील प्रतिष्ठानने आयोजन केले आहे. तसेच १२ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसादाचे देखील वाटप केले जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठान कडून देण्यात आली आहे.
दरम्यान सायंकाळी ५ वाजता सवाद्य भव्य मिरवणूक काढली जाणार असून या मिरवणुकीत शिवभक्तासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.