जय हिंद आणि जाणीव फाउंडेशनच्या वतीने उद्या नारीशक्ती सन्मान सोहळा
◻️ जागतिक महिला दिनानिमित्त गौरवशाली महिलांचा होणार सन्मान
◻️ नारीशक्ती सन्मान सोहळ्यासाठी तरुणी व महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | सुदृढ व निकोप समाज निर्मितीचे काम करणाऱ्या आणि महिलांसाठी एक हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या जय हिंद महिला मंच व जाणीव फाउंडेशन च्या वतीने उद्या नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या शनिवार दि. २ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालय येथे या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जय हिंद महिला मंचावतीने गौरवशाली महिलांचा सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे या भूषविणार असून यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचनताई थोरात, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, सौ. प्रमिला कर्डिले, डॉ. श्रद्धा वाणी, सौ. मायाताई पवार, सौ सुनीताताई गाडे सौ. दिप्तीताई सांगळे, सौ. मंगलाताई काकड, डॉ. दिपाली पानसरे, प्रा. बाबा खरात, सौ. सीमाताई सातपुते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
दरम्यान या नारीशक्ती सन्मान सोहळ्यासाठी जास्तीत जास्त तरुणी व महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.