यशाला कोणताही शॉर्टकट नसतो - प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे
◻️ प्रवरेचे आठ विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट पूर्व परीक्षा उत्तीर्ण
संगमनेर LIVE (लोणी) | विद्यार्थ्यानी विद्यार्थी दशेमध्ये ज्ञानग्रहण करताना जे जे काही आपल्याला आत्मसात करता येईल त्या गोष्टींचा सातत्याने ध्यास घेऊन यश काबीज केले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्या यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. असे प्रतिपादन डॉ. प्रदीप दिघे यांनी केले.
लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील कु. समृध्दी नहार, कु. मधुरा शेळके, कु. वनश्री जैन, कु. कल्याणी जेजुरकर, यश खतोडे, कु. गौरी खर्डे, पुजारी सौरभ आणि सार्थक नहार या आठ विद्यार्थ्यांनी चार्टर्ड अकाउंटट या परीक्षेची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांचा सन्मान करताना संस्थेचे अतांत्रिकचे प्राचार्य डॉ. दिघे बोलत होते.
डॉ. दिघे यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोणकोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत हे सांगतानाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आजच्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर आपले ज्ञान संपादन करण्यासाठी जर केला तर त्यांना यशाला सहज गवसनी घालता येऊ शकते. असेही त्यांनी सांगितले.
सुरुवातीला वाणिज्य विद्याशाखेचे उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब रणपिसे यांनी आपल्या प्रास्ताविकातून वाणिज्य विद्या शाखेतील आठ विद्यार्थ्यांनी जे काही यश संपादन केले आहे त्याची पार्श्वभूमी विशद केली.
दरम्यान या सन्मान सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. राम पवार, उपप्राचार्य डॉ. अनिल वाबळे, डॉ. विजय निर्मळ, डॉ. विजय खर्डे, डॉ. शांताराम चौधरी, डॉ. रंजना दिघे, डॉ. उमेश ताजणे उपस्थित होते.